Viral Video | सध्या रंगांचा सण चालू आहे. सगळीकडे लोक होळी खेळत आहेत. होळी खेळताना रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. बरेच लोक हे होळीमध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात. ज्यावर वेगवेगळे रंग लागतात आणि त्या पांढऱ्या कपड्यावर ते रंग देखील खुलून दिसतात. परंतु हे रंग काढताना मात्र खूप त्रास होतो. कारण हे रंग सहजासहजी घरी कपडे धुतल्याने निघत नाही. आणि त्यानंतर तुम्ही एकदा घातलेला हा पांढरा ड्रेस तुम्हाला फेकून द्यावा लागतो. कारण त्याच्यावरचे डाग जात नाहीत आणि त्याचा काहीही उपयोग होत नाही.
परंतु होळीच्या रंगाने रंगलेल्या कपड्यांवर रंग घालवण्याचा एक जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहिजे पांढऱ्या कपड्यांवरील होळीचे वेगवेगळे रंग कसे घालवायचे हे सांगत आहे. तर आता आपण पाहूया या व्हिडिओमध्ये (Viral Video) त्या महिलेने नक्की काय सांगितले आहे.
गरम पाण्यात टाका या गोष्टी | Viral Video
एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात ब्लिचिंग पावडर वॉशिंग पावडर आणि थोडेसे विनेगर टाका. त्यानंतर तुम्ही हातात ग्लोज घालून ते पाणी ढवळून घ्या. त्या पाण्यात ब्लिचिंग पावडर असते. त्यामुळे तुम्ही त्यात हात बुडवू नका. अन्यथा तुमच्या हाताला देखील इजा होण्याची शक्यता असते. आता तुम्ही होळीच्या रंगाने रंगलेले कपडे रात्रभर त्या पाण्या त भिजत घाला. त्यानंतर तुमच्या कपड्यांवरील रंग कमी झाल्याचे तुम्हाला दिसेल परंतु पूर्णपणे गेलेला नसेल.
रंग काढण्याचा जादुई उपाय
यामध्ये तुम्हाला कपडे घासण्याची गरज नाही. ते कपडे पाण्यात तुम्हाला पाच ते दहा मिनिट ठेवायचे आहे. त्यानंतर यावरील कलर आपोआप गायब होतात. त्या महिलेने पाण्यात पांढऱ्या कपड्यांवरील डाग घालवण्यासाठी आला टाकला आहे. पाण्यात आला टाकल्यानंतर ते कपडे फक्त भिजवले आणि शेवटी तर त्या कपड्यांवरील रंग पूर्णपणे निघाला आहे आणि पूर्ण कपडा पांढरा शुभ्र निघालेला आहे.
त्यामुळे यावेळेस जर तुमच्या पांढऱ्या कपड्यांवरील होळीचे डाग काढायचे असेल, तर तुम्ही इतर कोणताही पर्याय न अवलंबता पाण्यात आला टाकून जर तुमचे कपडे धुतले तर चुटकीसरची तुमच्या पांढऱ्या कपड्यांवरील डाग निघून जातील. आणि तुम्हाला हे कपडे पुन्हा पुन्हा घालता येतील.