Viral Video | पाण्याशी मस्ती करणे पडले महागात ! माय लेक गेली समुद्रात वाहून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. ज्या ठिकाणी आपण घरबसल्या जगभरातील सगळ्या गोष्टी पाहू शकतो. सोशल मीडियामुळे हे जग अगदी जवळ आलेले आहे. परंतु या टेक्नॉलॉजीने जशी प्रगती केलेली आहे. तसे त्याचे अनेक वाईट परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियावर रोज असे लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. काही व्हिडिओ हे स्टंटचे असतात. तर काही व्हिडिओ पाहून अगदीच आपल्या काळजाचा ठोका चुकतो.

आज-काल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. अगदी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा ते करत नाही. अनेक लोकांना या व्हिडिओ आणि सेल्फीच्या नादात त्यांचा जीव देखील गमवावा लागलेला आहे. याबाबत अनेक बातम्या आपण पाहिलेल्या आहेत. अशातच हिवाळा सुरू झालेला आहे. आणि या हिवाळ्यामध्ये अनेक लोक हे बीचवर फिरायला जात असतात. बीचवर पाण्याच्या लाटांचा आनंद घ्यायला सगळ्यांनाच आवडतो. परंतु समुद्र कधी कधी इतका खवळतो की, त्यापुढे आपण काहीच करू शकत नाही.

समुद्राच्या लाटांची ताकद इतकी मोठी असते की, त्यात आपण केलेली छोटीशी चूक देखील आपल्या जिव्हारी बेतू शकते अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यातूनच हे समुद्राच्या पाण्याचे सत्य सिद्ध झालेली आहे.या व्हिडिओमध्ये एक तरुण महिला आणि तिचा पती मुलींचं समुद्रकिनारी बसलेली असतात. ते अत्यंत आनंदाने एन्जॉय करत असतात. परंतु अचानक एक जोरदार लाट आली आणि त्यामध्ये दोघींचा तोल गेला.

सुरुवातीला ती महिला आणि तिची मुलगी जोरदार आलेली लाट पाहून त्या लाटेचा आनंद घेत असतात. परंतु काही सेकंदातच त्यांचा तोल जातो. आणि त्या लाटांसोबत त्या देखील समुद्रात निघून जातात. त्या अवाढव्य असलेल्या लाटेसमोर कोणालाही काहीच करता आले नाही. आणि शेवटी त्या समुद्राच्या लाटांसोबत वाहून जाताना दिसत आहेत.