Viral Video | दुबई मॉलच्या मत्स्यालयात शार्कने दिला बाळाला जन्म, दुर्मिळ दृश्य सोशल मीडियावर व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे क्षणाला अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच आता दुबई मॉलच्या एक्वेरियममधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 9Viral Video) एक शार्क त्याच्या बाळाला जन्म दिलेला आहे. आणि या दुर्मिळ दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हे दृश्य दुबई मॉलच्या एक्वेरियममध्ये भेट देण्यासाठी आलेल्या किती तरी लोकांनी पाहिलेली आहे. यामध्ये शार्कने त्याच्या बाळाला जन्म दिला. आणि हा जादुई क्षण कॅप्चर करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांना खूप जास्त आवडत आहे. हा व्हिडिओ शेअर करून ,”आज सकाळी आमच्या एक्वेरियममध्ये एका बेबी शार्कचा जन्म होताना पाहणे हा एक जादुई क्षण आहे.” असे लिहिलेले आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक्वैरियममध्ये पोहताना एक शार्क आपल्या बाळाला जन्म देत आहे. शार्क क्षणभर थांबते आणि मग बेबी शार्क एक्वैरियमच्या आत सरकताना दिसते. बेबी शार्क पडतो आणि एक्वैरियममध्ये उतरतो. तो पृष्ठभागावर येताच, लगेच त्याचे शरीर सक्रिय होते आणि तो वर तरंगतो. या व्हिडिओमध्ये एक लहान मानवी मूल देखील दिसत आहे जो मत्स्यालयात शार्क माशांना जन्म देताना पाहत आहे. हे दुर्मिळ दृश्य एक्वैरियमला भेट देण्यासाठी आलेल्या लोकांनीही पाहिले आणि त्यांच्यापैकी एकाने हा जादुई क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/C-AorCDomth/?utm_source=ig_embed&ig_rid=f08addc7-13ee-4f90-82f7-42f83f8b1d15

हा व्हिडिओ (Viral Video) शेअर झाल्यापासून हजारो लोकांनी तो पाहिला आणि लाईक केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “हे पाहून खूप आनंद झाला.” दुसऱ्याने लिहिले, “व्वा! किती सुंदर आहे ते.” तिसऱ्याने लिहिले- काल आम्ही दुबई मॉलमध्ये मत्स्यालय पाहण्यासाठी गेलो होतो. तोपर्यंत मूल आईच्या पोटातच होते. आज जन्म घेणे किती चमत्कारिक वाटते.”

दुबई मॉल, UAE च्या वेबसाइटनुसार, हे मत्स्यालय आणि पाण्याखालील प्राणीसंग्रहालयात 140 हून अधिक प्रजातींसह हजारो जलचर प्राणी आहेत. या विशाल मत्स्यालयाची क्षमता 100 दशलक्ष लिटर आहे आणि या टाकीमध्ये आणखी 400 शार्क आहेत. हे दुबई मॉलमधील एक अतिशय लोकप्रिय आणि पर्यटक आकर्षण केंद्र आहे.