Viral Video | दारूच्या नशेत चालकाने चालवली ST; धक्कादायक व्हिडीओ आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे क्षणार्धात अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. आपण घरी बसून जगातील कानाकोपऱ्यात काय चाललेले आहे? याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ शकतो. सोशल मीडियावर (Viral Video ) व्हायरल होणारे काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे सखोल ज्ञान देणारे असतात. ज्यामुळे घरी बसलेल्या प्रत्येक माणसालाच फायदा होतो. जगभरात काय चाललेले आहे या गोष्टीची माहिती आपण एका क्लिकवर घेऊ शकतो.

सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ बदलापूरमधील आहे. बदलापूरमध्ये एक एसटी चालक चक्क दारूच्या नशेमध्ये गाडी चालवताना दिसत आहे. प्रवाशांनी भरलेली एसटी तो ड्रायव्हर दारूच्या नशेत चालवत आहे. त्यामुळे आता एसटीत बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे.

सोशल मीडियावर (Viral Video) बदलापूरमधील या एसटी चालकाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. काही प्रवाशांनी याचा व्हिडिओ काढलेला आहे. आणि यामुळेच त्याचा हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. त्या एसटी चालकाने दारू पिलेली आहे आणि दारूच्या नशेत तो गाडी चालवता आहे. अत्यंत जोरात स्पीडने तो गाडी चालवत आहे. तसेच एसटीतील प्रवासी देखील घाबरल्याचे या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

सीएसटी बदलापूर डेपोमधून दुपारी साडेतीन वाजता बदलापूर ते कुडेरान या ठिकाणी निघाली होती. यावेळी एसटीचा ड्रायव्हर दारूच्या नशेत होता.बदलापूरमधून बाहेर पडताच एसटीच्या चालकाने अत्यंत वेगाने एसटी चालवायला सुरुवात केली. प्रवाशांनी देखील त्याला एसटी हळू चालवण्यास सांगितले. परंतु त्याने काहीही ऐकले नाही. उलट प्रवाशांशी तो वाद घालत बसला. एसटीचा वेग इतका जास्त होता की, दोन ते तीन वेळा ही एसटी रस्त्याच्या खाली देखील गेली होती. असे प्रवाशांनी सांगितलेले आहे. त्यावेळी एसटी मधील काही प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे. त्यामुळे हा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. आणि प्रवाशांनी त्या एसटी चालकावर कारवाई करण्याची मागणी देखील केलेली आहे.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि जर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी दारूच्या निषेध गाडी चालवली. तर देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहतो. अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर आलेल्या आहेत.