हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) अनेकदा ट्रेनने प्रवास करतेवेळी काही अपंग किंवा गरीब लोक पैसे मागताना दिसतात. यामध्ये तृतीय पंथियांचा देखील समावेश असतो. हे लोक धावत्या ट्रेनमध्ये वाट्टेल त्या डब्यात चढतात आणि प्रवाशांकडे पैशांची मागणी करतात. काही तृतीयपंथी पैसे नाकारल्यास शांतपणे निघून जातात. तर काही मात्र शिवीगाळ करतात, श्राप देतात. इतकंच नव्हे तर काही तृतीय पंथीयांना पैसे देण्यास नकार दिला तर हे लोक मारहाण करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
तृतीयपंथीयांना पैसे नाकारले म्हणून मारहाण झाल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. यातील काही समोर आल्या तर काहींची वाच्यता देखील झालेली नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Viral Video) पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही तृतीयपंथी लोकांकडून आलेल्या धक्कादायक अनुभवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये एका तरुणाने तृतीयपंथीयांना पैसे न दिल्याने त्याला चक्क मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे.
कुठे घडली घटना? (Viral Video)
बिहारच्या पाटणा कटिहार इंटरसिटीमध्ये ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. जिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पैसे न दिल्याच्या रागातून तृतीय पंथीयांनी प्रवाशांना थेट मारहाण केल्याचे या व्हिडिओतून पहायला मिळत आहे. (Viral Video) या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेनमध्ये काही तृतीयपंथी चढले आहेत आणि ते प्रवाशांकडून जबरदस्ती पैसे मागत आहेत. दरम्यान काही प्रवाशांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याचे दिसत आहे. तर त्यांनी रागात येऊन थेट त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे आपण पाहू शकतो.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया X वर aazdrajeev नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. जो आता सोशल मीडियावरील इतर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. (Viral Video) एका वृत्तानुसार, ट्रेनमध्ये ही घटना घडताच प्रवाशांनी रेल्वेच्या दानापूर विभागाकडे तक्रार केली होती. हे प्रकरण दानापूर रेल्वे विभागाच्या TTE अंतर्गत असल्यामुळे २५ फेब्रुवारी रोजी आरपीएफने प्रवाशांना मारहाण करणाऱ्या तृतीयपंथीयांना अटक केली आहे.
या व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले, ‘हे सर्व काय होतंय, हे सगळं कधी थांबणार?’ तर आणखी एकाने म्हटले, ‘काही तृतीयपंथी चांगले असतात. जे पैसे देतात त्यांच्याकडून घेतात. जे नाही देत त्यांच्या मागे लागत नाहीत. पण काहीजण जबरदस्तीने पैसे मागून किंवा हिसकावून घेतात.. हे थांबायला हवं’. (Viral Video)