Viral Video : हिरवा समोसा पाहून खवय्ये भडकले; म्हणाले, ‘काहीही फालतूपणा…’

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर बरेच वेगवेगळे पदार्थ, त्यांच्या रेसिपी व्हायरल होत असतात. यातील बरेच पदार्थ कधी टेस्टसुद्धा केलेले नसतात. पण पाहून अत्यंत आकर्षक वाटतात. तर काही पदार्थांचे फ्युजन पाहूनच पोट बिघडल्यासारखं वाटत. तुम्ही आजपर्यंत खूपवेळा समोसा खाल्ला असेल. खुसखुशीत आवरणात भरलेला चमचमीत बटाटा, सोबत हिरवी लाल चटणी खाण्याची मजा म्हणजे स्वर्गसुख. बऱ्याच लोकांसाठी समोसा म्हणजे वीकपॉइंट. पण समोसा हेल्दी खाण्यात येत नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हिरवा समोसा हेल्दी आहे बरं का. तुम्ही खाल्लाय का हिरवा समोसा? एकदा हा व्हिडीओ बघाच.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तुम्ही हिरवा समोसा पाहू शकता. होय. हिरवा समोसा. या व्हिडिओत सगळ्यात आधी एका प्लेटमध्ये हिरवा समोसा दिसतो. ज्याचे दोन भाग केल्यानंतर त्यामधील सारण दिसते. यावर मस्त चटणी घातली जाते आणि मग एक स्त्री तो समोसा खाऊन टेस्टी असल्याचे सांगताना दिसत आहे. या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे हा समोसा पालकपासून बनवला आहे. त्यामुळे हा समोसा हेल्दी असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘पालक समोसा – हेल्दी समोसा आम्ही शोधून काढला आता जेवढी इच्छा होईल तेवढं खा’, असे लिहिले आहे.



आतापर्यंत तुम्ही बरेच वेगवेगळे समोसे ट्राय केले असतील. (Viral Video)बटाट्यापासून ते पनीर, व्हेजिटेबल्स, मलाई आणि अजून बरंच काही. पण झा समोसा त्यातल्या त्यात चवीला आणि दिसायला दोन्ही प्रकारे वेगळा आहे. ज्यामुळे सोशल मीडिया युजर्सची लक्ष वेधण्यात हा समोसा यशस्वी झाला आहे. असे असले तरीही या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर that_food_freak नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून फिटनेस फ्रिक लोकांना थोडा आनंद व्यक्त केला असला तरी खवय्यांनी मात्र नाराजी दर्शवली आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एकाने लिहिले आहे, ‘हेल्दी तर असे म्हणत आहात जणू हा समोसा तेलात नाही पाण्यात तळलेला आहे’. (Viral Video) तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘याला समोसा कसं काय म्हणायचं?’. अन्य एकाने लिहिलंय, ‘कृपया समोस्यासोबत फालतूपणा करू नका’. तर आणखी एकाने, ‘हा रंग वाटत आहे, पालक नाही’, असे म्हटले आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हा समोसा खरोखरच हेल्दी आणि टेस्टी वाटतोय असे म्हटले आहे.