Viral Video : सोशलवरचं नवं फॅड पाहिलं का ? केसांना लावले चॉकलेट आईस्क्रीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : मंडळाची सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियावर कशाचं सोल्युशन मिळत नाही? ब्युटी टिप्स , होम रेमिडी यांनी तर सोशल मीडिया व्यापून गेला आहे. तुम्ही कधी ट्राय केले आहेत का ? सोशल मीडिया वरील ब्युटी हॅक्स (Viral Video)? आज आम्ही तुम्हाला अशाच एका होम रेमिडी बद्दल सांगणार आहोत ज्या व्हीडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु आहे.

खाण्यासाठी नाही केसांना चॉकलेट आईसक्रीम

आतापर्यंत तुम्ही केसांना मेहंदी , हेअर कलर , डाय , विविध हेअर पॅक लावलेले पहिले असतील . मात्र केसांना तुम्ही कधी चॉकलेट आईस्क्रीम लावलेलं पहिले आहे काय ? पण आजकाल लोक आईस्क्रीमने केस रंगवतात हे तुम्हाला कळले तर तुमच्या भूवया नक्कीच उंचावतील… आजच्या युगात मेंदी किंवा केसांचा रंग वापरण्याऐवजी लोक केसांना आईस्क्रीम लावत आहेत. तुमचा विश्वास बसत नसेल तर एक महिला (Viral Video) केसात आईस्क्रीमचे बार कसे लावतीये हे एकदा पहाच , हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ @tiktokcringe.pop या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

‘टिक टॉक क्रिंज’ नावाने इंस्टाग्रामवर असलेल्या या महिलेने या व्हिडिओमध्ये सांगितले की , तिला कोणीतरी आईस्क्रीमने केस कसे रंगवायचे याचा व्हिडिओ मेसेजमध्ये तिला पाठवला होता. पुढे तुम्हाला या व्हिडिओत (Viral Video) दिसेल की ती महिला एका बाऊलमध्ये तीन आइस्क्रीमचे बार फोडून तिच्या केसांना लावते. केस रंगवले आहेत की नाही हे पाहण्यासाठी ती खूप उत्सुक आहे. मात्र, आईस्क्रीम लावल्यानंतर काय झाले? हे तिने या व्हिडिओमध्ये सांगितलेले नाही.

युजर्सनी दिल्या प्रतिक्रिया

या व्हिडिओवर अनेक युजर्सनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे “उत्तम परिणामांसाठी केसांमध्ये पेट्रोल टाका आणि त्यात माचिसची काडी घाला”. शिवाय या व्हिडिओमध्ये या रेमिडीचा परिणाम काय झाला ? याची माहिती देखील दिली नसल्यामुळे याचा परिणाम (Viral Video) काय झाला ? अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. बऱ्याच युजर्सना हा हॅक आवडला नाही. शिवाय एकाने प्रतिक्रिया दिली आहे की, “ताई तू हे आईस्क्रीम मला दिले असतेस तर मी खाऊन टाकले असते “.