Viral Video | पावसाळा आला की अनेक लोक फिरायला जातात. पावसाळ्यामध्ये डोंगरदर्यांवरून धबधबे वाहत असतात. या पावसाचा आनंद घ्यायला सगळ्यांना खूप आवडतो. पावसाळा तसेच निसर्ग जेवढा चांगला आहे तितकाच काही वेळा आपल्याला भयानक रूप देखील दाखवतात. अगदी पर्यटकांच्या जीवावर बेततेल असे प्रसंग देखील घडतात यावर्षी देखील असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. त्यामुळे कधीच पाण्याची खेळू नका. असं आपल्याला आपल्या पूर्वजांनी देखील सांगितलेले आहे.
अशातच आता नागपुरातून पावसाळ्यात आलेल्या पर्यटकांमधील एक ठराविक व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्यामध्ये तलावावर उभे राहून स्टंटबाजी एका तरुणांनी केलेली आहे. परंतु ती स्टंटबाजी त्याच्या जीवावर बेतलेली आहे. त्या तलावाच्या किनाऱ्यावर उभा राहून स्टंटबाजी करणारा हा तर कोणत्या तलावात कोसळलेला आहे. त्यानंतर तो तसाच पाण्याच्या प्रवाहा सोबत पुढे पुढे गेला आणि म्हणून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. हा धडकी भरवणारा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे जर तुम्हीही धबधब्यावर जाऊन, असे व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते आधी स्वतःच्या जीवाची काळजी करा.
स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूर जिल्ह्यामध्ये तलावावर पर्यटकांची मोठी गर्दी जमलेली होती. या गर्दीतील एका व्यक्तीने तलावावर उभे राहून व्हिडिओ काढण्याचे धाडस केले. परंतु ते धाडस त्याच्या अंगलट आल्याने ही दुर्घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी अनेक लोक उपस्थित होते, तरी देखील त्याला त्याचा बचाव करता आले नाही. कारण पाण्याचा वेग इतका जास्त होता की, त्यासोबत तो तरुण वाहत गेला.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे या व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहू शकता की, तीन तरुण एका सांडव्यावरून तलावाचे पाणी समोरच्या दिशेने वाहते सांडव्याच्या भिंतीवर चालण्याचा प्रयत्न करू लागले. आणि त्यात एक तरुण यशस्वी झाला. जो सांडव्यावर उभा होता तो मागच्या दिशेला कोसळला. आणि पोहोच काही सेकंदातच त्याचा मृत्यू झालेला आहे. काही लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु ते त्यांना शक्य झाले नाही.