Viral Video | यावर्षी आपण 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचे 78 वर्षे पूर्ण केले आहेत. आपला भारत देश स्वतंत्र झालेला 78 वर्षे पूर्ण झालेले आहे. स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशाचा एक राष्ट्रीय सण आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात उत्साह असतो. शाळा कॉलेजमध्ये तर स्वातंत्र्य दिन हा कोणत्याही सणापेक्षा कमी नसतो. आपण लहानपणापासून स्वातंत्र्यदिनाबाबत खूप उत्सुक असतो. कारण या दिवशी शाळेमध्ये विविध कार्यक्रम असतात. अनेक विद्यार्थी त्यांचे कलागुण या दिवशी दाखवत असतात. सुंदर गाणी म्हणतात, देशभक्तीपर गीते म्हणतात. तसेच डान्स करतात. सध्या असाच एक 15 ऑगस्ट च्या शाळेतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये (Viral Video) जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलगा त्याच्या असा एक कलागुण दाखवत आहे. जे पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलं ही नेहमीच त् त्यांच्यात असणारे कलागुण हे सगळ्यांसमोर दाखवत असतात. काही जण या दिवशी भाषण करतात डान्स करतात. वेगवेगळी गाणी म्हणतात. परंतु या व्हिडिओमध्ये एका मुलाने अशी काही कला सादर केली आहे. जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच पाहिजे होताना दिसत आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या बाहेर होणारे या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, जिल्हा परिषदेच्या शाळेत विविध कलागुण सादर करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो यावेळी शाळेतील एक मुलगा विविध प्राण्यांचे आणि पक्षांची आवाज काढताना दिसत आहे. तो सुरुवातीला एका श्वानाचा ओरडण्याचा आवाज करतो. त्याचे सादरीकरण पाहून सगळेच हसतात. नंतर तो कावळा, कोकीळा, शेळी यांसारख्या विविध प्राण्यांच्या आणि पक्षांचे आवाज काढून दाखवतो. सुरुवातीला सगळेजण तरी हसत असले, तरी त्याने काढलेल्या या आवाजाच्या सगळ्यांनाच खूप कौतुक वाटले आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे कौतुक करण्यात आले.
हा व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 43 मिलियन पेक्षाही जास्त व्ह्यूज आलेले आहेत. तसेच 2 मिलियन पेक्षाही जास्त लाईक झालेले आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडिओवर कमेंट्स देखील करत आहेत.