Viral Video : पठ्ठ्याने केली कमाल ; 1 सेकंदात सुटले रुबिक क्यूबचे कोडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : जगभरात असे अनेक कोड्यांचे खेळ आहेत. जे सोडवणं म्हणजे एखाद्या आव्हानापेक्षा काही कमी नसते. त्यापैकी अशाच एका कोड्याचा खेळ म्हणजे रुबिक क्यूब. जन्माला येऊन एकदा तरी हे कोडं (Viral Video) सोडवावं असं म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही. भल्याभल्यांना हे रुबिक क्यूबचं कोडं सोडवणं जमत नाही. मात्र हल्ली अशा अनेक ट्रिक आल्या आहेत ज्यामुळे हे कोडं सहज सोडवता (Viral Video) येईल. सोशल मीडियावर रुबी क्यूब सोडवण्याच्या संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याच्या साहाय्याने एका व्यक्तीने रुबिक क्युबचे कोडे सेकंदात सोडवले आहे. चला पाहुयात काय आहे हा व्हिडीओ ? कसे सोडवाल कोडे ?

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओत एक व्यक्ती रुबिक क्यूब हातात घेऊन बसला आहे. तसेच समोर एक मोबाइल ठेवला आहे. रुबिक क्यूबची ज्याप्रकारे रचना असते, त्याप्रमाणे व्यक्ती मोबाइलमध्ये दिसणाऱ्या रुबिक क्यूबची (Viral Video) रचना करून घेते. त्यानंतर व्यक्ती एक बटण दाबते आणि रुबिक क्यूब सॉल्वर कोडं कसं सोडवायचं हे टप्प्याटप्य्याने दाखवते. नक्की कशाप्रकारे रुबिक क्यूबचे कोडं व्यक्तीने सोडवलं आहे.

@PicturesFoIder या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करीत असताना: I’d still find a way to mess up” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ४०. १ मिलियन व्हियूज (Viral Video) मिळाले आहेत तसेच अनेकांनी याच्यावर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ आवडल्याचे म्हंटले असून हा व्हिडीओ कोडं सोडवण्यासाठी फायदेशीर ठरल्याचे सुद्धा म्हंटले आहे.