भीतीदायक ! सराव करताना फुटबॉल प्लेयरच्या अंगावर वीज कोसळली; व्हिडिओ पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियामध्ये मॉस्कोजवळील ओरेखोवो-झुएवो शहराजवळ एक घटना घडली आहे जी सामान्यत: पाहिली जात नाही. इथल्या फुटबॉल मैदानावर सराव चालू असताना एका सोळा वर्षाच्या खेळाडूवर विज कोसळली. त्यानंतर या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले ज्यामुळे त्याचा जीव तर वाचला मात्र याक्षणी तो कोमामध्ये गेला आहे.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या मुलाच्या गळ्यावर विज पडली, ज्यामुळे तो भाग जळालेला आहे. इव्हान जाबोर्स्की असे या 16 वर्षीय फुटबॉल खेळाडूचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. इव्हान संघात गोलरक्षक म्हणून खेळत आहे मात्र जेव्हा वीज कोसळली तेव्हा तो पेनल्टी शूट करण्याचा सराव करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, फुटबॉलमध्ये गोलरक्षक संरक्षणासाठी चेंडू लागू नये म्हणून चेहऱ्या भोवती मेटल चिन वापरतात. या सरावादरम्यान इव्हानने हे देखील घातले होते आणि या मेटल चिनवरच वीज पडली. डॉक्टर म्हणतात की वीज पडल्यानंतरही इव्हान जिवंत आहे हा एक चमत्कारच आहे.

https://youtu.be/b0-ijyUDViU

इव्हान फुटबॉल क्लब झमान्याकडून खेळतो आणि तो परिसरातील एक अतिशय प्रसिद्ध खेळाडू आहे. प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले की ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा ना पाऊस पडला ना हवामान खराब होते, अशा परिस्थितीत अचानक वीज कोसळणे हे आश्चर्यकारकच आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लाइटनिंग देखील दिसत आहे. वीज कोसळल्यानंतर इव्हान बेशुद्ध पडला आणि त्याचा श्वासही थांबला. यानंतर, तोंडाने श्वास दिल्यानंतर त्याचा श्वास पुन्हा चालू लागला. त्यानंतर इव्हानला हेलिकॉप्टरने मॉस्कोमधील रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे सध्या तो कोमामध्ये आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment