विरूष्का’च्या मुलीचं नाव काय माहिती आहे का? ; चला जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतंच एका मुलीला जन्म दिला. स्वतः विराट कोहलीने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी देशवासियांना सांगितली होती. दरम्यान आता विरुष्काने आपल्या मुलीचं नाव देखील काय ठेवलं ते सांगितलं आहे.

अनुष्काने एक ट्विट करत पती विराट आणि मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते अतिशय आनंदी दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने “आमच्या मुलीने, वामिकाने आमचे आयुष्य एका वेगळ्याच स्तरावर नेले आहे! अश्रू, हसू, काळजी, आनंद या सगळ्या भावना काही मिनिटांच्या कालावधीत आम्ही अनुभवल्या आहेत” या आशयाचे ट्वीट केले आहे. ट्वीट करत अनुष्काने त्यांच्या मुलीचे नाव वामिका असल्याचे सांगितले आहे.

विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली होती. ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment