व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Asia Cup 2022: Virat Kohli च्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, रोहितच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

दुबई : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आजपर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. हाँगकाँगविरुद्ध आशिया चषकातील सामन्यातही विक्रमांच्या विराट यादीत आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात नाबाद 59 धावा केल्या. त्याच्या (Virat Kohli) या अर्धशतकी खेळीमुळे त्याने तसेच सूर्यकुमारसह साकारलेल्या 98 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताने हाँगकाँगला 192 धावांचे लक्ष्य दिले.

रोहित शर्माची बरोबरी
हाँगकाँगविरुद्ध सामन्याआधी आंतरराष्ट्रीय टी20त सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याचा मान रोहित शर्माकडे होता. रोहितनं आजवर 31 अर्धशतकं झळकावली आहेत. पण आज विराटनं (Virat Kohli) रोहित शर्माची बरोबरी केली. हाँगकाँगविरुद्ध त्यानं केलेलं अर्धशतक हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधलं 31 वं अर्धशतक ठरलं. त्यामुळे आता सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत विराट (Virat Kohli) आणि रोहित संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत.

विराट पुन्हा फॉर्मात
विराट कोहली (Virat Kohli) मागच्या काही सामान्यांपासून रनांसाठी झगडताना दिसत होता. मात्र नुकत्याच सुरु झालेल्या आशिया चषकात तो आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने (Virat Kohli) या चषकात पाकिस्तानविरुद्ध 35 तर हाँगकाँगविरुद्ध नाबाद 59 धावा केल्या आहेत.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?