हॅलो कृषी ऑनलाईन Virat Kohli-Rohit Sharma । भारतीय क्रिकेट संघाचे 2 अनमोल रत्न असलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीची चर्चा नेहमीच सुरु असते. खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने यापूर्वीच टेस्ट आणि टी- २० क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र अधून मधून त्यांच्या वनडे निवृत्तीच्या चर्चा आणि अफवाही सातत्याने समोर येत असतात. दोन्हीही खेळाडू २०२७ मधील एकदिवसीय वर्ल्ड कप खेळतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे. मात्र याच दरम्यान, आयसीसीच्या एका कृतीने क्रिकेट चाहत्यांच्या पोटात गोळा आला आहे. ICC च्या ताज्या क्रमवारीतून विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचीही नावे गायब झाली आहेत. त्यामुळे दोघांनी निवृत्ती घेतली कि काय? अशी शंका निर्माण झाली आहे.
खरं तर मागील आठवड्यात म्हणजेच १३ ऑगस्ट रोजीच्या क्रमवारीनुसार रोहित शर्मा हा दुसऱ्या स्थानावर होता, रोहित शर्माने एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर आझमला मागे टाकले होते, तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर होता. मात्र आता ८ दिवसातच दोघांचीही नावे कुठेच दिसेना झाली आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. दोन्ही खेळाडूंचा टॉप १०० मध्येही समावेश नाही. आयसीसीच्या रँकिंग सिस्टीममधील ही चूक किंवा तांत्रिक बिघाड असल्याचे बोललं जातंय.
कधी खेळली शेवटची वनडे – Virat Kohli-Rohit Sharma
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही (Virat Kohli-Rohit Sharma) आपला शेवटचा एकदिवसीय सामना फेब्रुवारी २०२५ मध्ये खेळला होता. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा तो अंतिम सामना होता ज्यात रोहितने तुफान बॅटिंग करत भारताला विजय मिळवून दिला होता. रोहितने अंतिम सामन्यात नेत्रदीपक खेळी खेळली होती. त्याचा फॉर्म बघता तो वनडे मधून निवृत्त होईल असे अजिबात वाटत नाही. हीच बाब विराट सोबत आहे. विराट कोहली हा वनडे क्रिकेटची रनमशीन मानली जाते. विराटचा एकदिवसीय सामन्यातील खेळ हा नक्कीच बघण्यासारखा असतो. त्याने आयपीएल मध्ये चांगली कामगिरी केली होती. विराटचा फिटनेस बघता तो सुद्धा वनडे मधून निवृत्ती घेण्याची शक्यता नाही.
कशी आहे नवीन क्रमवारी ?
१) शुभमन गिल ७८४ गुण
२) बाबर आझम ७३९ गुण
३) डॅरिल मिशेल ७२० गुण
४) चरिथ असलंका ७१९ गुण
५) हॅरी टेक्टर ७०८ गुण
६) श्रेयस अय्यर ७०४ गुण
७) शाई होप ६९९ गुण
८) इब्राहिम झदरन- ६७६ गुण
९) कुसल मेंडिस- ६६९ गुण
10) ट्रॅव्हिस हेड- ६४८ गुण




