हार्दिकला ओव्हर न देण्याचा कारणावरून सेहवाग भडकला ; म्हणाला की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली आणि 337 धावांचा यशस्वी पाठलाग केला. इंग्लडंचे फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना विराटने हार्दिक पांड्याला गोलंदाजी का दिली नाही यावरुन क्रिकेटप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. त्यातच आता विरेंद्र सेहवागनेही यावर संतप्त प्रतिक्रिया देताना कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पंड्या याना खडेबोल सुनावले आहेत.

इंग्लिश फलंदाजानी भारतीय गोलंदाजांवर आक्रमक केलं असताना देखील हार्दिक पांड्याला गोलंदाजी का देण्यात आली नाही असं कर्णधार कोहलीला विचारलं असता तेव्हा त्याने त्याची बॉडी आणि वर्कलोड यांचं संतुलन राखणं गरजेचं असल्याचं सांगितलं. यावरून माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने कोहलीवर निशाणा साधला.

पुढील काही महिने भारतीय संघ कोणताही सामना खेळणार नाही. संपूर्ण सामन्यात फिल्डिंग करून थकवा जाणूव शकतो. अशा स्थितीत हार्दिक पंड्याला ३-४ ओव्हर दिल्या तरी फार फरक पडला नसता असे सेहवाग म्हणाला. शस्त्रक्रियेनंतर तो अधिक क्रिकेट खेळला नाही. तो कसोटी सामने खेळला नाही. पाच टी-२० मध्ये २-३ ओव्हर टाकल्या. तर त्याने आता लोड का घेतला नाही. असे देखील असू शकते की पंड्याला आयपीएलच्या आधी कोणतीही दुखापत करून घ्याची नसले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment