Wednesday, February 1, 2023

कोण जिंकेल आयपीएल?? सेहवागने दिली ‘या’ संघाला पसंती

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल च्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत असून स्पर्धेचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहेत. गतविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज मध्ये आज जोरदार सामना होणार आहे.

आयपीएल 2021 मध्ये कोणता संघ विजेता होईल याबाबत अंदाज बांधणे कठीण असलं तरी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मात्र रोहित शर्माच्या मुंबई इंडिअन्सला आपली पसंती दिली आहे. मुंबई इंडिअन्स हाच संघ आयपीएल जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचं सेहवागने म्हंटल आहे.

- Advertisement -

दुसऱ्या टप्प्यात आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. माझ्या मते दिल्ली आणि मुंबईची टीम विजेतेपदाची दावेदार असेल. पहिल्या टप्प्यात चेन्नईचा सरासरी स्कोअर 201 होता. पण यूएईच्या पिचवर त्यांच्या बॅटींगवर परिणाम होईल, असं मला वाटतं. मला एका टीमची निवड करायची असेल तर ती टीम मुंबई असेल,’ असं सेहवाहनं स्पष्ट केलं.