हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे कार अपघात प्रकरणी (Pune Porsche Accident) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील सरकारी यंत्रणा, प्रशासनातील अधिकारी, राजकारणी, धनाढ्य यांचे हितसंबंध उघडकीस येऊ लागले आहेत. तसेच आरोग्य व्यवस्थेचा गोंधळ कारभार सुद्धा उघडा पडला आहे. त्यातच आता या अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा गटाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्या अडचणी सुद्धा वाढण्याची शक्यत आहे. खरं तर अपघात झाला त्याच रात्री सुनील टिंगरेंनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हेगाराला वाचवण्यासाठीच टिंगरे यांच्या धावून गेल्याचा संशय व्यक्त होऊ लागला. आता या प्रकरणात नवा उलगडा झाला आहे. आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी सुनील टिंगरे याना ७५ मिनिटात तब्बल ४५ वेळा कॉल केल्याची माहिती समोर आली आहे.
न्यूज १८नं पोलीस दलातील सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. १९ मे रोजी म्हणजेच अपघात झाला त्या रात्री आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी सुनील टिंगरे याना अवघ्या ७५ मिनिटात तब्बल ४५ कॉल केले, रात्री अडीच ते ३:४५ दरम्यान हे कॉल आले मात्र झोपेत असल्याने त्यांनी ते उचलले नाहीत. परंतु अग्रवाल यांचा त्याच रात्री टिंगरेंना इतके कॉल कसे काय आले अशी शंका निर्माण झाली आहे. तसेच अनेक चर्चाना सुद्धा उधाण आलं आहे. सुनील टिंगरे यांच्यावरील या आरोपांमुळे अजितदादा गट अडचणीत येण्याची शक्यता आहे.
टिंगरे यांचे एकट्या अगरवाल यांच्याशी संबंध नाहीत, तर या प्रकरणात अटक झालेल्या ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरेशीदेखील टिंगरेंचे संबंध आहेत. अजय तावरे यांची पार्श्वभूमी माहित असूनही सुनील टिंगरे यांनी हसन मुश्रीफ यांच्याकडे त्यांच्या नावाची शिफारस केली होती त्याबाबतचे पत्र समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे तावरेवर २०२२ मध्ये किडनी तस्करीचा आरोप झाला. यानंतर त्याची अधीक्षक पदावरुन काढून टाकण्यात आलं होते. पण टिंगरेंच्या शिफारसपत्रामुळे तावरे डिसेंबर २०२३ मध्ये पुन्हा अधीक्षकपदी रुजू झाले . याच तावरेनं पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलले आणि पुरावे नष्ट केले.