जत तालुक्याला म्हैसाळ योजनेचे पाणी मोफत देऊ – विशाल पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीच्या पाण्यासाठी पैसे घेण्याचे पाप भाजप ने केले आहे, पण मी तुम्हाला वचन देतो खासदार झाल्यावर शेतीला पाणी मोफत दिले जाईल. असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशालदादा पाटील यांनी दरिबडची येथे दिले.

विशाल पाटील यांनी मंगळवारपासून जत तालुका दौरा सुरू केला आहे. गेंढगिरीतून त्यांचा सुरूवात केली. त्यांनी देवनाळ, मेंढिगिरी, उंटवाडी, रावळगुंडी, मुचंडी, दरीबडाची, संख, भिवर्गी, तिकोंडी, करेवाडी, कोंतेबोबलाद या गावांचा दौरा केला. तालुक्यातील विविध गावात विशाल दादांचे फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

विशाल म्हणाले, स्वर्गीय वसंतदादा म्हैसाळ योजनेचे जनक आहेत. जत तालुक्याला पाणी देण्याचे त्याचं स्वप्न होते जत तालुक्यात पाण्याचा प्रश्न दादा कुटुंबिय सोडूवू शकते. प्रत्येकाच्या शेतात पाणी आले पाहिजे हे आमचं ध्येय आहे आणि हे पाणी शेतकऱ्याला फुकट मिळालं पाहिजे. जत तालुक्यातील शेतकऱ्याला म्हैसाळ योजनेचे पाणी मी मोफत मिळवून देईन. खासदारांनी दिल्लीत जाऊन काय करायचं असते हेच मुळात आपल्या खासदारांना कळले नाही. ज्यांना हिंदी आणि इंग्रजी साधा बोलता येत नाही तेच दिल्लीत जाऊन काय दिवे लावणार आहेत , असा टोला त्यांनी लगाविला. तर जत तालुक्याची अवस्था भयानक आहे, जनावरांना प्यायला पाणी नाही. चारा नाही. माणसांना प्यायला पाणी नाही अशा अवस्थेत टँकर सुद्धा मिळू शकत नाही. मी आपल्याला न्याय मिळवून देईन, अशी ग्वाही विशाल पाटील यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे, विक्रमदादा सावंत, बाबासाहेब कोडग, महादेव अंकलगी, श्रीकांत शिंदे, मच्छिंद्र वाघमोडे, आप्पासाहेब पवार, रमेश, पाटील, सिद्धअण्णा सिरसाट, प्रकाश पाटील, सुभाष बिराजदार, सुरेश कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Comment