सातारा | कोल्हापूर विभागाचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या युपीएससी च्या प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्हचे काॅल सिद्धिविनायकाकडूनच गेले असल्याचा खुलासा करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. इतकंच नव्हे तर गणपती ज्याला अपत्या पाहीजे त्याला अपत्य देतो असे म्हणुन वाद ओढवून घेतला आहे. गणेश मंडळांच्या कर्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.
‘डीजे, डोल्बी लावण्याएवजी भावगीतं लावा, भक्तीगीतं लावा. तसं केलं तर गणपती बाप्पा प्रसन्न होईल. माझी खात्री आहे की गणपती बाप्पा प्रसन्न होतो. मी स्वत: उदाहरण आहे. कारण मी गणपतीच्या पुस्तकातून शिकून आलोय. मी एवढा अंधश्रद्धाळू आहे की माझी प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्ह आणि माझी कुठल्या राज्यात पोस्टींग होणार याचे सगळे फोन सिद्धिविनायक मंदिरातूनच गेले असल्यावर माझा विश्वास आहे. मी गणपती बाप्पाचा मोठा भक्त आहे’ असे विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले आहे.
‘ज्या गणपती बाप्पाच्या पुजनाने प्रत्तेक कार्याची सुरवात होते, जो विद्यार्थ्याला विद्या देतो, धन पाहीजे त्याला धन देतो, अपत्य पाहीजे त्याला अपत्य देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो. पोलीसांना मात्र का टेन्शन देतो हेच कळत नाही’ असे म्हणुन नांगरे पाटील यांनी नागरिकांना पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
न्यायालयाचे निर्देश आपल्या भल्यासाठी आहेत. लोकांच्या कल्याणासाठी आहेत.’मी असं म्हणत नाही टाळ आणि चाळ ही आपली संस्कृती आहे. मला मान्य आहे की नाचलं पाहीजे, गायलं पाहिजे, धिंगाना केला पाहिजे, मस्ती केली पाहिजे. पण ती पाॅसिटीव्ह असली पाहिजे, रचनात्मक असली पाहिजे’ असे म्हणुम पाटील यांनी नागरिकांना गणेशोत्सव काळात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दंगा करायचा तर तो भगतसिंग, राजगुरु, सुखदेव सारखा करा असं पाटील यांनी म्हटले आहे.
https://youtu.be/OBPjMvn9_u4