हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा पर्यटनासाठी समृद्ध देश असून येथील ऐतिहासिक वारसा जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. प्रत्येक ठिकाणी नैसर्गिक सौंदर्याबरोबरच ऐतिहासिक ठेवा जतन करणारी ठिकाणे पाहायला मिळतात. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे भारतातील विविध किल्ले वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे . राजपूत, मुघल, आणि द्रविडीयन स्थापत्यशैलीने बांधलेले हे किल्ले भूतकाळातील राजेशाही वैभवाची साक्ष देतात. तसेच अनेक गोष्टींनी भारताला समृद्ध बनवले आहे. महाराष्ट्रातील किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देतात, तर इतर राज्यांतील किल्ले त्याच्या विशिष्ट सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जातात. तर आज आपण अशाच भारतातील प्राचीन किल्यांची वैशिष्टये पाहणार आहोत.
किल्ला मुबारक –
किल्ला मुबारक पंजाबमध्ये असून , भटिंडामध्ये स्थित हा किल्ला भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे. सुमारे सात प्रकारच्या विटांनी बांधलेल्या या किल्ल्याच्या भिंती ऐतिहासिक वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहेत.
ग्वाल्हेर किल्ला –
मध्यप्रदेशमधील उंच वाळूच्या खडकांवर वसलेला हा किल्ला तोमर घराण्याच्या इतिहासाशी निगडित आहे. ग्वाल्हेर किल्ला राजपूत स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
कांगडा किल्ला –
कांगडा किल्ला हिमाचल प्रदेशात इसवी सन पूर्व चौथ्या शतकात बांधलेला भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे. कटोच राजवंशाच्या इतिहासाशी निगडित हा किल्ला हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो.
मेहरानगड किल्ला –
राजस्थान , जोधपुरमध्ये स्थित हा किल्ला राजपूत स्थापत्यकलेचे प्रभावी उदाहरण आहे. याला मयूर ध्वज किल्ला म्हणूनही ओळखले जाते. किल्ल्याच्या नक्षीकामाने तो अद्वितीय बनवला आहे. भारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यांमुळे देशाचा भूतकाळ आणि सांस्कृतिक वारसा जिवंत राहतो. हे किल्ले केवळ वास्तुकलेच्या दृष्टीनेच नव्हे, तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठिकाण आहेत. भारतातील हे ऐतिहासिक किल्ले देशाच्या वैभवशाली भूतकाळाचा गौरव वाढवतात. त्यामुळे या केल्यानं अन्यनसाधारण महत्व आहे.