IRCTC ने आणले आहे धार्मिक टूर पॅकेज!! आयोध्यासह 8 शहरांना देता येईल भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीसोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी फिरायला जायचे असेल तर आयआरसीटीसीने (IRCTC) एक चांगले पॅकेज बनवले आहेत. या पॅकेज अंतर्गत तुम्ही 8 शहरातील धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता. खास म्हणजे, हा प्रवास तुमचा भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमधून होईल. ज्यात तुम्हाला कोलकाता, गंगा सागर, यात्रा बैद्यनाथ, गया, पुरी, कोणार्क, गंगासागर, कोलकाता, वाराणसी, अयोध्या अशा स्थळांना भेट देता येईल. त्यामुळे या संपूर्ण पॅकेजची माहिती जाणून घ्या.

IRCTC चे पॅकेज काय आहे?

IRCTC ने आणलेल्या या टूर पॅकेजमार्फत पर्यटकांना विष्णुपद मंदिर, गया, बिहारमधील स्थानिक मंदिरे, बैद्यनाथ मंदिर, जसदीह, जगन्नाथ मंदिर आणि कोणार्क मंदिर, पुरी स्थानिक मंदिर, गंगा सागर, काली मंदिर कोलकाता, काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी येथील स्थळांना भेट देता येईल. इतकेच नव्हे तर, अयोध्या, हनुमान गढी, आणि या परिसरात जवळ असणाऱ्या मंदिरांचे दर्शन घेता येईल. हा संपूर्ण प्रवास 9 रात्र आणि 10 दिवसांचा असणार आहे. तसेच या टूरला सुरुवात 25 एप्रिल रोजी सुरू होईल आणि 4 मे रोजी संपेल. भारत गौरव टुरिस्ट ट्रेन आग्रा कँट, ग्वाल्हेर, वीरांगना लक्ष्मीबाई, ओराई, कानपूर, लखनौ, अयोध्या कँट, काशी, बनारस येथील स्थानकावर थांबेल.

बुकिंग खर्च किती असेल?

या टूर अंतर्गत प्रवास करताना स्लीपर क्लास हवे असल्यास एकत्र असणाऱ्या प्रति व्यक्तीला 17,500 रुपये भरावे लागतील. तर लहान मुलांसाठी 16400 रूपये मोजावे लागतील. 3 AC साठी एका व्यक्तीला 28,300 रूपये भरावे लागतील. तर लहान मुलांना 27,000 रूपये मोजावे लागतील. 2 AC साठी प्रत्येक व्यक्तीला 37200 रूपये भरावे लागतील. तर लहान मुलांना 35600 रुपये मोजावे लागतीलया टूर पॅकेज अंतर्गत प्रवासादरम्यान आणि फिरताना सर्व सुविधा पुरविण्यात येतील.

बुकिंग कसे करावे?

या पॅकेज अंतर्गत दूर करण्यासाठी सर्वात प्रथम बुकिंग करावे लागेल. हे बुकिंग करण्यासाठी सर्वात IRCTC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये तुम्हाला तुमचे टूर पॅकेज बुक करता येईल.