हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) हि प्रवासी सेवा, केटरिंग, आणि पर्यटन सेवा पुरवणारी संस्था आहे. त्यांनी यंदा देखो अपना देश या उपक्रमांतर्गत एक आकर्षक टूर पॅकेज सादर केले आहे. हे पॅकेज पाच दिवसांचे असून, त्यामध्ये प्रवाशांना मध्य प्रदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळेल. हे टूर पॅकेज 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. हि टूर कमी, पैशामध्ये चांगल्या सेवा देणार आहे. यासाठी प्रवाशांनी लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे.
ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट
या टूर पॅकेजमध्ये उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर, आणि इंदूर या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट दिली जाणार आहे . उज्जैन हे महाकालेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, तर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. महेश्वर हे आपल्या नर्मदा नदीच्या तीरावरच्या भव्य घाटांसाठी प्रसिद्ध आहे, आणि इंदूर हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचे व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र आहे. या टूरमध्ये प्रवाशांना राहण्याची आणि भोजनाची सोय मोफत मिळणार आहेत . यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या काळात कोणतीही गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. हि टूर 4 रात्री आणि 5 दिवसांची असणार आहे. प्रवाश्याना फ्लाइटने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. 6 नोव्हेंबरला हि टूर हैदराबादपासून सुरू होईल.
कमी तिकिटात उत्तम प्रवास
IRCTC च्या मध्य प्रदेश महादर्शन टूर पॅकेजसाठी, एकट्याने प्रवास केल्यास 35450 रुपये प्रति व्यक्ती घ्यावे लागतील . दोन लोकांसोबत प्रवास केल्यास 28950 रु प्रत्येक व्यक्तीला , तर तीन लोकांसाठी 27900 रुपये प्रत्येक व्यक्तीसाठी मोजावे लागतील . त्याचप्रमणे 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 21450 रु प्रति व्यक्ती असणार आहे आणि 2 ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसाठी हे भाडे 18950 रु प्रत्येक व्यक्तीसाठी असतील. तुम्ही कमी पैश्यात चांगला प्रवास करू शकता .
ट्रॅव्हल इन्शुरन्सची सोय आणि नोंदणी
या टूर पॅकेजमध्ये अनेकदा ट्रॅव्हल इन्शुरन्सची सोय देखील दिली जाते. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रवाशांना इन्शुरन्स कवच मिळते. हे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे ते निश्चिंतपणे प्रवास करू शकतात. पॅकेजची नोंदणी IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. इच्छुक प्रवाशांनी लवकर नोंदणी करून अपेक्षित आहे . त्याचबरोबर प्रवासी 8287932229 या क्रमांकावर कॉल करून टूर पॅकेज बुक करू शकतात.