Vitamins | जेवणात करा ‘या’ जीवनसत्वांचा समावेश; हृद्यविकार होईल कायमचा दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vitamins | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. धावपळीच्या जगात अनेक लोक फास्ट फूड खातात. त्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक जमा होऊ लागतात. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे आजकाल लोकांना हृदयविकाराचा झटका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल त्याचप्रमाणे चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक तयार होतात. आणि ते धमन्यांच्या भिंतीवर जाऊन चिकटतात. त्यामुळे तुमची रक्तभिसरणची प्रक्रिया मंदावते.

या सगळ्यामुळे रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. धमन्यांवर अडकलेल्या या ब्लॉकचा रक्तभिसरणवर परिणाम होऊन त्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित आणि आजार वाढतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या जेवनामध्ये काही बदल करणे खूप गरजेचे आहे. तुमच्या जेवणात काही जीवनसत्त्वांचे (Vitamins) सेवन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. आता आपण या जीवनसत्त्वाबद्दल माहिती जाणून घेऊया.

व्हिटॅमिन सी | Vitamins

व्हिटॅमिन सी व्यक्तीच्या रक्तवाहिन्या, हाडे आणि रोगप्रतिकारक शक्तीचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त आहे. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे, जे कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन रोखण्यात मदत करते. व्हिटॅमिन सी शरीरातील जळजळ देखील कमी करते.

व्हिटॅमिन-बी

रक्तामध्ये आढळणाऱ्या होमोसिस्टीनची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्यांना नुकसान होऊ शकते आणि प्लेक होऊ शकतो. अशा परिस्थितीत, व्हिटॅमिन बी रक्तातील होमोसिस्टीनची पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यास मदत होते.

व्हिटॅमिन के | Vitamins

व्हिटॅमिन के शरीरात आढळणारी प्रथिने सक्रिय करते, जे कॅल्शियम रक्तवाहिन्यांऐवजी हाडांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात, जिथे त्याची गरज असते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होत नाही आणि ते ब्लॉक होत नाही.

व्हिटॅमिन-ई

व्हिटॅमिन ई आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तवाहिन्या कडक होण्यापासून प्रतिबंध होतो. हे रक्तवाहिन्यांना स्वच्छ आणि सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करते.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी कॅल्सिफाइड प्लेक तयार होण्यापासून रोखून धमन्यांना होणारे नुकसान टाळण्यास मदत करते, ज्यामुळे धमनी अवरोधित होण्यास प्रतिबंध होतो.