टीम हॅलो महाराष्ट्र। काल रात्री दीपिका पादुकोण जेएनयुतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थानात विद्यापीठात पोहचली होती. यावेळी हल्ल्यातील जखमी विद्यार्थ्यांची तिने भेट घेत आपला पाठींबा विद्यार्थी आंदोलनाला दर्शविला. दरम्यान, दिपीकाच्या जेएनयु भेटीचे सोशल मीडियावर वायरल झाल्यावर अनेकांनी जसे तिच्या या कृतीचे कौतुक केलं त्याचप्रमाणे सोशल मीडियावर तिला आता ट्रोल सुद्धा केलं जात आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने दीपिकाच्या जेएनयु भेटीबाबत आता गौप्यस्फोट करत ट्विटरवर एक अजब दावा केला आहे.फॉक्सस्टार स्टुडिओ निर्मित दीपिकाचा छपाक हा चित्रपट येत्या १० तारखेला प्रदर्शित होत आहे. अग्निहोत्री ह्यांचा म्हणण्यानुसार .फॉक्सस्टार स्टुडिओ मधील एका आतल्या माणसाचा त्यांना फोन आलेला होता. त्यांच्याशी बोलतांना जेएनयुमधील तुकडे-तुकडे गॅंगबद्दल त्यांना काहीच माहित नसल्याचे मला आश्चर्य वाटलं. दीपिकाच्या जेएनयुत ज्याण्याने ते मला विचारात होते कि जर हा सिनेमा यामुळं पडला तर याला जबाबदार कोण असणार? कारण दीपिकाला तर तिचा व्यवसायिक निधी मिळालेला आहे.
अग्निहोत्री आपल्या ट्विटमध्ये विवेकने असेही लिहिले आहे की, “मला सांगण्यात आले आहे की दीपिका पादुकोण यांना फिल्म प्रमोशनसाठी आधी निर्भयाच्या आई-वडिलांसोबत उभे राहण्याची सूचना देण्यात आली होती. पण शेवटच्या क्षणी तिने आपली योजना बदलली कारण त्यावेळी जेएनयू ट्रेंडिंगमध्ये होते निर्भया नव्हती. अग्निहोत्री यांनी एकूणच दीपिकाचे दीपिकाच्या जेएनयु भेटीमागे केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याच आपल्या ट्विट मधून दर्शविले आहे.