पुणे प्रतिनिधी | २० ऑगस्ट 2013 ला डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाला, त्याला आता ६ वर्षे पूर्ण होत आहेत.गेल्या सहा वर्षांतदेशात अनेक विवेकी कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. या गोष्टी लक्षात ठेऊन डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त, हिंसेला विरोध करता यावा आणि तरुणाई अधिकाधिक बोलक करता याव , आणि एकत्र आणता याव यासाठी महाराष्ट्र अंनिस-शाखा पनवेल, विवेक जागर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा घेत आहे.
संविधान वाचवणे,लोकशाही ला बळकट करण्याचा प्रयत्न या मधून अंनिस करणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील तरुणांना अंनिस ने आवाहन केल आहे. प्रयोग विचारमंचावर सादर करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे.
स्वतःतील लेखक, दिग्दर्शक,याबरोबरच माणूस म्हणून घडण्यासाठी इथे विशेष कलागुणांना वाव आहे. आणि विजेत्यांना प्रथम पारितोषिक-५००० रु. आणि सन्मानचिन्ह, द्वीतिय पारितोषिक-३०००रु. आणि सन्मानचिन्ह आणि इतर पारितोषिके.
पथनाट्य विषय: हिंसा के खिलाफ, मानवता कि ओर..
१८ ऑगस्ट २०१९ रोजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पनवेल
पूर्वनोंदणी आवश्यक:
अंतिम दिनांक: १ ऑगस्ट २०१९
संपर्क: वैभव- 8082693903,
सिद्धेश- 9870911911