Vivo T3 5G : Vivo ने कमी किमतीत लाँच केला 5G मोबाईल; पहा काय फीचर्स मिळतील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने भारतीय बाजारात नवा 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo T3 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये ग्राहकांना अनेक दमदार फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. हा मोबाईल २ कलर व्हेरिएन्ट मध्ये बाजारात आणला आहे. येत्या 27 मार्च रोजी या मोबाईलची पहिली विक्री सुरु होणार आहे. ग्राहक फ्लिपकार्ट आणि विवोच्या अधिकृत साइटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतील. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात…

6.67-इंचाचा डिस्प्ले-

Vivo T3 5G मध्ये 120Hz रीफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले आह. या डिस्प्लेला 2400×1080 पिक्सल रिझोल्यूशन आणि 1800 nits चा पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने या मोबाईल मध्ये Mediatek Dimensity 7200 प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन Android 14 बेस्ड Funtouch OS 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. विवो च्या या स्मार्टफोन मध्ये 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे.

50MP चा कॅमेरा- Vivo T3 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo T3 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 MP चा मुख्य कॅमेरा, 2 MP चा सेकंडरी कॅमेरा आणि 2MP चा बोके कैमरा मिळतो, तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16 MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. Vivo T3 5G मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 44W चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

हा स्मार्टफोन एकूण २ स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. तर 8GB + 256GB व्हेरिएन्टची किंमत 21,999 रुपये आहे. सध्या कंपनी या दोन्ही मॉडेल वर 2000 रुपयांची सूट देत आहे. त्यामुळे आणखी कमी किमतीत हा मोबाईल तुम्ही खरेदी करू शकाल. हा स्मार्टफोन कॉस्मिक ब्लू आणि क्रिस्टल फ्लेक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.