Whats app : व्हॉट्सॲप आणणार भन्नाट फिचर ! तुम्ही बोलताच मेसेज आपोआप होणार टाईप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Whats app : इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून जबरदस्त लोकप्रिय असलेले (Whats app) आपल्या ग्राहकांना वरचेवर नवीन फीचर्स देत असते. आता (Whats app) ने ग्राहकांसाठी भन्नाट ॲप आणले आहे. त्यामुळे यूजर्सचा वेळ आणि मेहनत नक्कीच वाचणार आहे. क्या आहे हे फिचर त्याचा युजरला कसा फायदा होईल ? चला जाणून घेऊया…

हे नवीन फीचर आणल्यानंतर व्हॉट्सॲपवर आलेले व्हॉइस मेसेज आपोआप टाईप होतील. व्हॉट्सॲपच्या फीचर्सची माहिती देणाऱ्या Wabetainfo ने या नवीन फीचरची माहिती दिली आहे. अध्या (Whats app) चे व्हॉइस मेसेजेस आणि व्हॉइस चाट हे फीचर्स उपलब्ध आहेत. मात्र हे दोन्ही फीचर्स वापरत असताना कधीकधी तुमचा मेसेज पुढच्या व्यक्तीपर्यंत नीट पोहचत नाही. नव्या फिचर मध्ये व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्शन व्हॉईस मेसेजला मजकुरात रुपांतरीत करतो. यामुळ युजर्स मॅसेज वाचून समजून घेऊ शकतात.

फीचरचा स्क्रीनशॉट आला समोर (Whats app)

ज्यांना मेसेजेस ऐकून नव्हे तर वाचून जाणून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे एक उत्तम वैशिष्ट्य असेल. नवीन अपडेटनंतर, हे फीचर वापरण्यासाठी, तुम्हाला व्हॉट्सॲपला काही परवानग्या द्याव्या लागतील. नवीन फीचरचा स्क्रीनशॉट (Whats app) देखील समोर आला आहे ज्यामध्ये हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला आणखी 150MB डेटा लागेल आणि स्पीच रेकग्निशनचा ॲक्सेस देखील द्यावा लागेल. हे फीचर कोणत्याही व्हॉइस मेसेजला टेक्स्टमध्ये रूपांतरित करेल.