32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह Vivo चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि किंमत

Vivo V21
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वीवो कंपनीने भारतात नुकताच वीवो V21e 5G हा स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा फोन बाजारात वनप्लस नॉर्ड CE 5G आणि iQOO Z3 5G सारख्या फोनला टक्कर देण्याची शक्यता आहे. वीवो V21e 5Gचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला 64 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर कॅमेरा आहे. वीवोच्या या फोनची किंमत 24,990 रुपये आहे. हा स्मार्टफोन 30 जूनपासून फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन इंडिया यावर उपलब्ध होणार आहे. जर वीवो इंडिया स्टोरवर एचडीएफसी क्रेडिट किंवा डेबिट कार्डने हा फोन खरेदी केला तर ग्राहकांना यावर 2500 रुपयांचा कॅशबॅकसुद्धा मिळणार आहे.

Vivo V21e 5G फीचर्स
– 6.44 इंची AMOLED डिस्प्ले
– स्क्रीन रेजोलूशन 1080×2400 पिक्सल
– Android 11 बेस्ड Funtouch OS 11.1
– MediaTek Dimensity 700 SoC प्रोसेसर
– 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज
– 4,000mAh बॅटरी
– 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट

कॅमेरा
Vivo V21e 5G मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. तर सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा फोन 0 ते 72 टक्के चार्ज होण्यासाठी केवळ 30 मिनिटांचा वेळ असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी यात Wifi, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी पोर्ट असे फीचर्स आहेत.