Vivo X200 Series | Vivo चा हा प्रीमियम स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च; 6000mAh बॅटरीसह असणार ही वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vivo X200 Series | आजकल मोबाईल ही सगळ्यांनी गरज झालेली आहे. असा एकही माणूस सापडणार नाही ज्याकडे मोबाईल नाही. त्यातही आपल्याकडे एखादा स्टाईलिश मोबाईल असावा असं प्रत्येकाला वाटते. अशातच आता vivo ने भारतात आपली नवीन Vivo X200 सिरीज लॉन्च केल्याची माहिती दिली आहे. कंपनीने अधिकृतपणे या सिरीजचा टीझर रिलीज केला आहे. मात्र, कंपनीने अद्याप लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. कंपनीने या फोनचा टीझर X वर लॉन्च केला आहे, ज्यामध्ये फोनच्या कॅमेरा फीचर्सवर अधिक फोकस करण्यात आला आहे.

ही सिरीज आधीच मलेशियामध्ये लॉन्च केली गेली आहे आणि आता भारतीय बाजारपेठेत आपली जागा बनवण्याच्या तयारीत आहे. विवोने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर व्हिडिओ टीझर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फोनच्या कॅमेऱ्याची क्षमता दाखवण्यात आली असून त्यावर चंद्राचे फोटो घेण्यावर भर देण्यात आला आहे. हे सूचित करते की या फोनमध्ये शक्तिशाली कॅमेरा सेटअप असेल. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही मालिका भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Vivo X200 सिरीजची संभाव्य वैशिष्ट्ये | Vivo X200 Series

या आगामी स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, असे मानले जाते की Vivo X200 मध्ये 6.67 इंचाचा LTPS AMOLED डिस्प्ले असू शकतो जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तर Vivo X200 Pro ला 6.78 इंच 8T LTPO AMOLED डिस्प्ले मिळू शकतो ज्याची कमाल ब्राइटनेस 4500 nits असेल. X200 मध्ये 5800mAh बॅटरी दिली जाऊ शकते, तर X200 Pro मध्ये 6000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच, दोन्हीमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल, तर प्रो मॉडेलमध्ये 30W वायरलेस चार्जिंग देखील उपलब्ध असेल.

कॅमेरा सेटअप

स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, 50MP प्राइमरी कॅमेऱ्यासह, फोनमध्ये 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा देखील दिला जाईल. याव्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये X200 मध्ये 50MP Sony IMX882 टेलिफोटो लेन्स देखील असेल.

दुसरीकडे, X200 Pro मध्ये 200MP Samsung HP9 सेंसर दिला जाईल. याशिवाय, दोन्ही उपकरणांमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा असेल. दोन्ही मॉडेल्सना IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे ते पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहेत.