Vivo ने लाँच केले 2 जबरदस्त Mobile; पहा किंमत अन् फीचर्स

Vivo X90 and X90 Pro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात आपले 2 जबरदस्त मोबाईल लाँच केले आहेत. Vivo X90 आणि Vivo X90 Pro असे या दोन्ही मोबाईलची नावे असून अनेक नवनवीन वैशिष्ट्यांनी हे दोन्ही मोबाईल सुसज्ज आहेत. आज आम्ही तुम्हाला या मोबाईलचे फीचर्स, कॅमेरा , प्रोसेसर आणि किंमत याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला सांगणार आहोत.

Vivo X90 मध्ये काय काय फीचर्स आहेत?

Vivo X90 मध्ये 120Hz चा रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. मोबाइलला MediaTek Dimensity 9200 चिपसेट देण्यात आले आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo X90 च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 12MP पोर्ट्रेट सेन्सर आणि 12MP अल्ट्रावाइड सेन्सर देण्यात आला आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फी साठी समोरील बाजूस 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाईलला 4810mAh ची बॅटरी मिळतेय. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते .

Vivo X90 Pro चे फीचर्स –

Vivo X90 Pro मध्ये 6.78-इंचाचा 3D कर्वड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला सुद्धा 120Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. मोबाइलला MediaTek Dimensity 9200 चिपसेट देण्यात आला आहे. X90 Pro मध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 50MP पोर्ट्रेट सेन्सर, आणि 12MP अल्ट्रावाइड सेन्सर देण्यात आला आहे. तर व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी स्मार्टफोनला 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. X90 Pro मध्ये 4870mAh बॅटरी मिळते. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते .

किंमत किती?

X90 च्या 8GB / 256GB व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये आणि 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 63,999 रुपये आहे. तर दुसरीकडे, Vivo X90 Pro 12GB/256GB व्हेरिएंटचा मोबाईल 84,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. 5 मे 2023 हे दोन्ही स्मार्टफोन Flipkart, Vivo India च्या ई-स्टोअर आणि रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असतील.