Vivo Y100t । चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने बाजारात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y100t असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये कंपनीने 64-मेगापिक्सल कॅमेरा, 12GB रॅम सह अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. सध्या या मोबाईलचे लॉन्चिंग चीनमध्ये झालं असून लवकरच तो भारतीय बाजारात सुद्धा दाखल होईल. आज आपण विवोच्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
Vivo Y100t या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.64 इंचाचा फुल HD + LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 Hz असून त्याला 1,080×2,388 पिक्सेल रिसोल्युशन मिळत. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर देण्यात आला असून हा मोबाईल एकूण ३ स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा – Vivo Y100t
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये पाठीमागील बाजूला 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये पॉवर साठी 5,000 mAh बॅटरी बसवली असून हि बॅटरी 120 W SuperVOOC चार्जिंग आणि 65 W USB-PD चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी साठी मोबाईल मध्ये 4G LTE, 5G, WiFi, Bluetooth, GPS, USB Type-C पोर्ट आणि 3.5 mm हेडफोन जॅक यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
किंमत किती?
जस आम्ही तुम्हाला सांगितलं, कि हा मोबाईल सध्या चीनमध्ये लाँच झाला आहे. Vivo Y100t च्या 8 GB + 256 GB व्हेरिएंटची किंमत CNY 1,449 म्हणजेच अंदाजे 17,650 रुपये आहे. 12 GB + 256 GB मॉडेलची किंमत CNY 1,649 म्हणजेच अंदाजे 19,310 रुपये आणि 12 GB + 512 GB व्हेरियंटची किंमत CNY 1,960 म्हणजेच 19,600 रुपये आहे. हा स्मार्टफोन पांढरा, हिरवा, आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.