Vivo Y200e 5G : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने भारतीय बाजारात एक नवा मोबाईल लाँच केला आहे. Vivo Y200e 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. 27 फेब्रुवारीपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी खुला होणार आहे. आज आपण विवोच्या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
6.67-इंचाचा डिस्प्ले –
Vivo Y200e 5G ची लांबी 163.1मिमी , रुंदी 75.81 मिमी आणि जाडी 7.79 मिमी आहे. या मोबाईलचे वजन 191 ग्रॅम आहे. स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा Samsung E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. FHD+ रिझोल्यूशनने सुसज्ज असलेला हा डिस्प्ले 394ppi पिक्सेल डेन्सिटी आणि 1200 nits पर्यंत पीक ब्राइटनेससह येतो . या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित FunTouch OS 14 वर काम करतो. कंपनीने यामध्ये ,5,000mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा – Vivo Y200e 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y200e 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 2-मेगापिक्सेल बोकेह लेन्स देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोन मध्ये ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हा मोबाईल IP54 रेटिंगसह येतो, म्हणजेच पाणी आणि धुळीपासून मोबाईल सुरक्षित राहतो.
किंमत किती?
Vivo Y200e 5G मोबाईल 6GB, 8GB रॅम सह लाँच करण्यात आला असून त्यानुसार त्याची किंमत वेगवेगळी आहे. यातील 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे. तुम्ही हा मोबाईल ब्लॅक डायमंड आणि केशर ऑरेंज रंगात खरेदी करू शकता. येत्या 27 फेब्रुवारीपासून हा मोबाईल प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईट Flipkart सहित Vivo India वेबसाइट वर खरेदीसाठी उपलब्ध होईल