Vodafone Idea Data Plan | सध्या मार्केटमध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आलेल्या आहेत. ज्या त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. अशातच आता वोडाफोन आयडिया या कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेला आहे. वोडाफोन आयडियाने आता ग्लोबल स्ट्रेमींग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्ससोबत देखील पार्टनरशिप केलेली आहे. तसेच त्यांनी लवकरच त्यांच्या ग्राहकांना नेटफ्लिक्स सोबतचे पोस्टपेड प्लॅन लॉन्च करण्याचे आश्वासन देखील दिलेले आहेत. त्यामुळे वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता त्यांना त्यांच्या रिचार्जसोबत (Vodafone Idea Data Plan) ओटीटीचा देखील अनुभव घेता येणार.
वोडाफोन आयडियाचा नवीन प्लॅन | Vodafone Idea Data Plan
वोडाफोन आयडियाने सांगितले आहे की, या पार्टनरशिप अंतर्गत युजर त्यांच्या आवडीच्या कोणत्याही डिवाइसवर म्हणजेच मोबाईल, टेलिव्हिजन किंवा टॅबलेटवर स्ट्रीमिंग अनुभवू शकतात. वोडाफोन आयडियाने सध्या त्यांच्या प्रीपेड ग्राहकांना नेटफ्लिस ऑफर करणे सुरू केलेले आहे. आणि लवकरच बंडल पोस्टपेड प्लॅन देखील लॉन्च करणार आहे. कंपनीने नवीन दोन प्रीपेड प्लॅन देखील सादर केलेले आहेत. या नेटफ्लिक्सच्या बेसिक सबस्क्रीप्शन शिवाय आता ग्राहकांना अमर्यादित कॉल आणि डेटाचा अनुभव घेता येणार आहे. तसेच युजर त्यांच्या मोबाईलवर त्याचप्रमाणे टीव्हीवर देखील पाहू शकणार आहेत.
वोडाफोन आयडियाचा 998 रुपयांचा प्लॅन
वोडाफोन आयडियाने हा 998 रुपयांचा पहिला पॅक जारी केले आहे. यामध्ये 1.50 जीबी डेटा सोबत दर दिवशी 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉल्स आणि नेटफ्लिक्स बेसिक हे 70 दिवसांच्या वैद्यसह दिलेले आहे.
वोडाफोन आयडियाचा 1399 रुपयांचा प्लॅन
वोडाफोन आयडियाच्या दुसऱ्या पॅकची किंमत ही 1399 रुपये एवढी आहे. ज्या प्लॅनची वैद्यता 84 दिवस एवढी आहे. यामध्ये तुम्ही अमर्यादित कॉल्स, नेटफ्लिक्स तसेच दररोज 2.50 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकता.