VOdafone- Idea Recharge Plan | 128 रुपयांचा VI चा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

VOdafone- Idea Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | VOdafone- Idea Recharge Plan सध्या बाजारामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. मार्केटमध्ये त्यांनी त्यांचे स्वतःचे असे एक स्थान निर्माण केलेले आहे. काही वर्षांपूर्वी वोडाफोन-आयडियाचे (VOdafone- Idea Recharge Plan ) खूप चांगले ग्राहक होते. परंतु त्यांच्या अनेक सेवा देण्यात या असफल झाल्याने ते त्यांचे ग्राहक देखील गमावत चाललेले आहेत. तसेच या कंपनीवर अनेक कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे. या सगळ्या गोष्टींचा भार असून देखील आता वोडाफोन-आयडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन सुरू केला आहे. या कंपनीने नुकतेच 19 आणि 49 रुपयांचे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले होते.

अशातच आता कंपनीने पुन्हा एकदा एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची किंमत केवळ 125 रुपये एवढी आहे. ही योजना सर्व दूरसंचार मंडळातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सगळ्या IOS आणि अँड्रॉइड युजर्सला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

125 रुपयांचा प्रीपेड प्लॅन | VOdafone- Idea Recharge Plan

वोडाफोन आयडियाचा 125 रुपयांचा प्लॅन हा एक डेटा प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस एवढी आहे. ही आपल्याला अंतर्गत युजर्सला दररोज एक जीबीचा डाटा दिला जातो. याचा अर्थ हा प्लॅन ग्राहकांना 28 जीबीचा डाटा देतो. हा डेटा पॅक ऑन पॅक असल्याने युजर्सकडे ते वापरण्यासाठी सक्रिय आधार प्रीपेड योजना असणे गरजेचे आहे.

वोडाफोन आणि आयडिया (VOdafone- Idea Recharge Plan ) ही कंपनी सध्या अनेक आर्थिक संकटांचा सामना करत आहे. तरीदेखील या कंपनीने हा एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. आपली समस्या कमी करण्यासाठी कंपनीने फॉलोऑन पब्लिक ऑफरिंग द्वारे 18000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखलेली आहे. असे मानले जात आहे की हा देशातील सर्वात मोठा असेल जो 18 ते 22 एप्रिल दरम्यान सदस्यता घेऊ शकेल. दुसरीकडे असे बोलले जात आहे की, पैसे मिळाल्यानंतर वोडाफोन- आयडिया जिओ आणि एअरटेल सारख्या केली कोणी कंपन्यांना आव्हान देणार आहे.