हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची (Volvo XC40 Recharge) चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर Volvo Cars India ने भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार Volvo XC40 Recharge लॉन्च केली आहे. वोल्वो च्या XC40 रिचार्जची एक्स-शोरूम किंमत 55.90 लाख रुपये आहे. गाडीची बुकिंग 27 जुलै 2022 पासून सुरु होणार असून डिलिव्हरी ऑक्टोबर 2022 पर्यंत मिळेल. Volvo ची ही इलेक्ट्रिक SUV MINI Cooper SE, Kia EV6, Audi e-tron आणि BMW i4 सारख्या वाहनांना तगडी फाईट देईल.
काय आहेत फीचर्स-
या इलेक्ट्रिक कारमधील (Volvo XC40 Recharge) इन्फोटेनमेंट आणि टेलिमॅटिक्स XC60 फेसलिफ्टमधून घेण्यात आले आहेत. यात नवीन डिजिटल डायल आणि नवीन अँड्रॉइड आधारित इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. या कारमध्ये ड्रायव्हरला गुगल मॅप्स आणि असिस्टंट, ई-सिमच्या मदतीने प्लेस्टोअरचे अनेक अॅप्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, सेन्सर आधारित ADAS तंत्रज्ञान आहे. व्होल्वो या इलेक्ट्रिक कारवर 3 वर्षांची आणि बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी देत आहे. तसेच या इलेक्ट्रिक कारसोबत 11kW चा वॉल-बॉक्स चार्जर दिला जात आहे.
एका चार्ज वर 418 किमी धावणार-
Volvo XC40 रिचार्जला 78kWh बॅटरी असेल जी 150kW DC फास्ट चार्जिंगच्या मदतीने फक्त 33 मिनिटांत 10 ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. बॅटरी फूल चार्ज (Volvo XC40 Recharge) केल्यावर 418 किमी अंतर कापेल, असा दावा कंपनीने केला आहे. वोल्वो ची ही गाडी फक्त 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. या इलेक्ट्रिक कारचे वजन पेट्रोल मॉडेलपेक्षा 400 किलो जास्त म्हणजेच 2188 किलो आले आहे.
किंमत- (Volvo XC40 Recharge)
भारतात या (Volvo XC40 Recharge) इलेकट्रीक SUV ची एक्स शोरुम किंमत 55.90 लाख रुपये आहे. या गाडीची बुकिंग 27 जुलै 2022 पासून सुरु होणार असून डिलिव्हरी ऑक्टोबर 2022 पर्यंत मिळेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 50,000 रुपयांच्या टोकन रकमेवर तुम्ही बुकिंग करू शकता.
हे पण वाचा :
Audi A8 L 2022 :बाजारात धुमाकूळ घालणार Audiची A8 L लक्झरी सेडान; BMW, मर्सिडीजला देणार तगडी फाईट
Maruti Suzuki Grand Vitara 2022 : मारुती सुझुकीची Grand Vitara लाँच; पहा काय आहे किंमत?
Ather 450x Gen 3 : Ather ने लॉंच केली दमदार इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि फीचर्स
Citroen C3 Launch : दमदार फीचर्ससह Citroen C3ची भारतात धमाकेदार एन्ट्री; पहा काय आहे किंमत