हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या दोन दिवसांपूर्वी देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच येत्या 19 एप्रिलपासून या निवडणुकांची मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 4 जून रोजी अंतिम निकाल जाहीर होईल. परंतु या सगळ्या तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की मतदानाच्या दिवशी तुम्हाला पगारी रजा दिली जाईल की नाही. कारण, मतदान करणे हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळेच तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे की, मतदानाच्या दिवशी सुट्टीसंदर्भात घटनेमध्ये कोणती तरतूद आहे. (Voter Awareness)
भारतीय राज्यघटनेने 18 वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला आहे.त्यामुळे हा अधिकार बजावत असताना कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. अशावेळी जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मतदान करण्यापासून रोखले तर त्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते. मुख्य म्हणजे, लोकप्रतिनिधी कायदा 1951, (RP Act) नुसार, मतदान होत असलेल्या भागांमध्ये प्रत्येक कंपनीने मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे. तसेच, ही सुट्टी त्यांची पगारी असणे ही आवश्यक आहे. कंपनीला मतदानाच्या दिवशी एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा अधिकार नाही.
कर्मचाऱ्याला तक्रार करण्याचा अधिकार (Voter Awareness)
थोडक्यात सांगायचे झाले तर, एखादा व्यक्ती पुणे शहरात नोकरीला असेल. आणि पुणे शहरात अमुक अमुक तारखेला मतदान होणार असेल तर त्या व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी घेण्याचा अधिकार असतो. कंपनीकडून त्या व्यक्तीला पेड सुट्टी देणे ही तितकेच आवश्यक आहे. एखाद्या कंपनीने असे केले नाही तर त्या कंपनी विरोधात कारवाई केली जाऊ शकते. (Voter Awareness) महत्त्वाचे म्हणजे, एखाद्या कंपनीने मतदानाच्या दिवशी तुमची पगारी रजा मंजूर केली नाही तर कर्मचारी ECI किंवा प्राधिकरणाशी संपर्क साधू शकतो. तसेच तक्रार दाखल करू शकतो.