Voting List : मतदान यादीत तुमचं नाव आहे का? इथे करा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Voting List । देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. भारतात लोकसभेच्या तब्बल ५४३ जागा आहेत. त्यासाठी एकूण ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदानाच्या तारखाही निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १७ एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा आहे. भारत हा लोकशाही जपणारा देश असून मतदार हाच लोकशाहीचा राजा असतो. त्यामुळे मतदान करून प्रत्येकाने आपला हक्क आणि कर्तव्य तर बजावलेच पाहिजे.

यंदाची निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी निवडणूक आयोगने कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाने यासाठी तब्बल २७ अँप्स लाँच केले आहेत. त्या अँपच्या माध्यमातून देशभरातील मतदारांना निवडणुकीच्या संदर्भातील संपूर्ण माहिती घरबसल्या मिळू शकते. निवडणुका जाहीर झाल्या की मतदार यादी देखील जाहीर होते आणि ही मतदार यादी दरवेळी बदलत असते. त्यामुळे प्रत्येकाने मतदानापूर्वी मतदार यादीत तुमचं नाव आहे का हे तपासलं पाहिजे. तुमचं नाव मतदार यादीत (Voting List) आहे कि नाही हे तुम्हालाही चेक करायचं असेल तर त्यासाठीची प्रोसेस अगदी सोप्पी आहे.

इथे करा चेक- Voting List

सर्व प्रथम तुम्हाला https://voters.eci.gov.in/ वर जावे लागेल.
येथे तुम्हाला सर्च इन इलेक्टोरल रोलवर क्लिक करावे लागेल.
आता एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्रा बाबत संपूर्ण डिटेल्स द्यावे लागतील.
यामध्ये नाव, वय, जन्मतारीख, लिंग, राज्य आणि जिल्हा इत्यादी तपशील टाकावे लागतील.
आता बॉक्समध्ये खाली एक कॅप्चा कोड येईल तो व्यवस्थित टाका आणि सर्च वर क्लिक करा.
त्याच पेजवर तुम्हाला दुसरी लिंक मिळेल ज्यामध्ये EPIC क्रमांक, राज्य आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
यानंतर एक नवीन टॅब उघडेल आणि तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासू शकाल.