Satara News : जिल्ह्यातील मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान

Medha Market Committee elections
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील 9 कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूका पार पडत असताना आज मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून एकूण 7 मतदान केंद्रांवर मतदानाही व्यवस्था करण्यात प्रक्रिया पार पडत असून 2 हजार 230 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 18 जागासाठी ही लढत होत आहे. त्यातील 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत तर 12 जागेसाठी 22 उमेदवार रिंगणात आहेत.

मेढा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकत्र लढताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी, ठाकरे गट, राष्ट्रवादीचा दुसरा गट आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र येऊन लढत होत आहेत. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे तिघे एकत्र येऊन या ठिकाणी लढत आहेत. त्यामुळे मेढा बाजार समितीमध्ये भाजप-राष्ट्रवादी असे समीकरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीचे दीपक पवार, ठाकरे सेनेचे सदाशिव सपकाळ, शिवसेना शिंदे गटाचे संदीप पवार एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत.

मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 18 जागांपैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर 12 जागेसाठी 22 उमेदवार रिंगणात आहेत. मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप राष्ट्रवादी युतीतून एकत्र उतरले असून महाविकास आघाडी गटाला टक्कर देत विरोधात राष्ट्रवादी आमदार गट निवडणूक लढत आहे.