किसनवीर कारखान्यांत सत्ताधाऱ्यांना दणका : आ. मकरंद पाटील यांच्यासह चाैघांचा विजय पक्का

सातारा प्रतिनधी | शुभम बोडके

किसन वीर कारखाना निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील पहिला निकाल हाती आलेला आहे. या पहिल्या निकालात सत्ताधारी मदन भोसले आणि शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांच्या शेतकरी विकास पॅनेलला धक्का बसला आहे. तर किसनवीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख आ. मकरंद पाटील (आबा) आणि बाळासाहेब चवरे यांचा विजय नक्की झाला आहे.

किसन वीर साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सकाळ पासून श्रीनिवास मंगल कार्यालय एमआयडीसी वाई येथे सुरु आहे. एकूण मतदान केंद्र 154 आहेत. मतपत्रिका वेगवेगळ्या करून मतमोजणी सुरु करण्यात आली. पहिले तीन्ही निकाल 12.00 वाजण्याच्या सुमारास हाती आले. यामध्ये सत्ताधाऱ्यांना धक्का बसला आहे. तर आ. मकरंद आबा यांच्या पॅनेलला पहिले तीन विजय नक्की करत विजयाकडे खाते उघडण्याकडे आगेकूच केली. त्याचबरोबर  महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भटक्या विमुक्त जाती व जमातीचा विशेष मागास प्रवर्गातून हणमंतराव चवरे, अनुसूचित जाती जमाती गटातील पहिल्या फेरीत 18352 मतापैकी 192 मते बाद झाली. तर संजय कांबळे (आघाडीवर- कपबशी) 11 हजार 117 मते तर सत्ताधारी पॅनेलचे सुभाष खुडे (पिछाडीवर- विमान) 7 हजार 46 मते पडली आहेत. सत्ताधारी पॅनेलचे सुभाष खुडे तब्बल 4 हजार 71 मतांनी मागे आहेत.

किसनवीर कारखाना निवडणुकीत सोसायटी मतदार संघ – मकरंद पाटील, (कपबशी- आघाडीवर), तर रतनसिंह शिंदे (विमान) पिछाडीवर आहेत. भटक्या विमुक्त जाती- जमातीचा विशेष मागास प्रवर्गातून हणमंतराव चवरे (कपबशी- आघाडीवर) 10 हजार 982 मते तर त्याच्या विरोधातील चंद्रकांत वामनराव काळे यांचा (विमान- पिछाडीवर) 7 हजार 194 मते पडली आहेत. त्यामुळे हणमंतराव चवरे तब्बल 3 हजार 788 मतांची आघाडी घेवून विजयाकडे वाटचाल करित आहेत..

पहिल्या फेरीतील पहिला आढावा

संस्था मतदारसंघ

आमदार मकरंद पाटील 113
रतन शिंदे 58

भटक्या विमुक्त जाती जमाती

हणमंत चवरे 10982
काळे चंद्रकांत 7194

अनुसूचित जाती जमाती -गट

बाद मतदान 192
संजय कांबळे 11117
सुभाष खुडे 7046

इतर मागासवर्ग प्रवर्ग

आनंदा जमदाडे 7117
शिवाजी जमदाडे 11031