Walking Barefoot | तुम्हीही घरी अनवाणी चालत असाल तर सावधान ! होऊ शकतात हे आजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Walking Barefoot | घराच्या बाहेर जाताना नेहमीच आपण पायामध्ये चप्पल घालून जातो. परंतु आपण घरात फिरताना सहसा चप्पल घालत नाही. अगदी काहीच लोक असे आहेत, ज्यांना पायाचा किंवा वाताचा त्रास आहे. ते लोक घरात चप्पल घालतात. परंतु तुम्ही जर घरात देखील अनवानी फिरत असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. घरातही अनवाणी चालल्याने अनेक आजार होतात. फरशीमुळे आपल्या त्वचेवर अनेक वाईट परिणाम होतात. त्यामुळे घरातही चप्पल घालणे गरजेचे आहे. परंतु जर तुम्ही घरातही अनवाणी चालत असाल, तर तुम्ही त्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. आता घरात अनवाणी चालण्याने (Walking Barefoot) कोणते आजार होतात. हे आपण जाणून घेऊया.

फंगल इन्फेक्शन | Walking Barefoot

तुम्ही जर घरात अनवाणी चालत असाल, तर तुम्हाला फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. कारण आंघोळीनंतर बाथरूममध्ये किंवा जमिनीवर साचलेल्या आद्रतेमुळे बुरशीची वाढ होते. तुम्ही जर अनवाणी चालत असाल, तर ही बुरशी तुमच्या पायाच्या त्वचेत प्रवेश करते. आणि तुम्हाला अनेक आजार होतात.

बॅक्टेरिया संक्रमण

तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील, तर त्यांच्याद्वारे सोडलेल्या बॅक्टेरिया या जमिनीवर जाऊन स्थित होतात. आणि जेव्हा तुम्ही अनवाणी चालता. त्यावेळी हे बॅक्टेरिया तुमच्या पायात प्रवेश करतात. त्यामुळे तुमच्या पायाला जखमा होणे, त्याचप्रमाणे इतर अनेक आजार होतात.

कीटक आणि परजीवी

घरामध्ये फरशीवर अनेक प्रकारचे कीटक आणि परजीवी असतातm जे आपल्याला दिसत नाहीत. परंतु जेव्हा आपण अनवाणी चालतो. तेव्हा हे कीटक तुमच्या पायामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे पायांना खाज सुटणे, वेदना होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

पाय दुखणे

घरातील फरशी खूप कठोर असते.त्याचप्रमाणे असमान असते. त्यामुळे तुमच्या पायाच्या तळव्यावर जास्त दाब येतो. आणि त्यामुळे तुम्हाला वेदना होतात. म्हणून जर तुम्ही फरशीवर अनवाणी चालत असाल, तर तुमचे पाय दुखू शकतात.

धोका टाळण्यासाठी काय करावे ? | Walking Barefoot

  • घरात नेहमी चप्पल किंवा मोजे घाला.
  • तुमच्या घरातील जागा नेहमी स्वच्छ आणि जंतुनाशकाने धुवून घ्या.
  • तुमचे पाय नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
  • तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग जाणवत असेल वेदना होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.