हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एकीकडे संपुर्ण जगभरात नवीन वर्षाचा जल्लोष साजरी होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याकांडाबाबत आक्रोश व्यक्त केला जात आहे. अशातच, मंगळवारी या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड (Walmik Karad) याने पुण्यात सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे. मुख्य म्हणजे, सीआयडीने वाल्मिक कराडला हत्याऐवजी खंडणी प्रकरणासाठी अटक केल्यामुळे न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
१:४५ वाजता तुरुंगात रवानगी
न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेनंतर पोलिसांसह आक्रोश जनता देखील वाल्मिक कराडच्या बारीक हालचालींवर आणि त्याच्या संबंधित घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढे, काही तासांमध्येच त्याला न्यायालयासमोर देखील हजर करण्यात आले. न्यायालयाने वाल्मिक कराडला कोठडीची शिक्षा सुनावल्यानंतर रात्री ठीक १:४५ वाजता त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
यानंतर रात्री वाल्मिक कराडला तुरुंगात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीनंतर तो रात्रभर ऑक्सिजन लावून झोपला होता. आज सकाळी बरोबर ८:३० वाजता वाल्मिक कराडला चहा देण्यात आला. मात्र त्याने तो घेतला नाही. पुढे ११:४५ दरम्यान त्याला जेवण देण्यात आले. परंतु त्याने फक्त अर्धी पोळी खाल्ली आणि 4 वाजता थोडा भात खाईल हे सांगितले.
महत्वाचे म्हणजे, मध्यरात्री डॉक्टरांनी वाल्मीक कराडची तपासणी केल्यानंतर त्याला प्रकृतीची कोणतीही समस्या नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आता पुढील सुनावणी पर्यंत म्हणजेच पुढचे 14 दिवस वाल्मीक कराड तुरुंगात शिक्षा भोगणार आहे.