औरंगाबाद : शहरात पहिला डोस 84 दिसापूर्वी घेतलेल्या नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण महिम वारंवार स्थगित होत आहे. शहरात तब्बल 50 हजार नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा असून, मनपाकडे लसीचा एकही डोस उपलब्ध नाही. लस कधी येईल, हे देखील निश्चित सांगता येत नाही.
18 वर्षावरील प्रत्येकाला लस देण्याच्या निर्णयची 22 पासून औरंगाबादमध्ये अंमलबजावणी सुरू झाली. लसीकरण मोहिमेला तरुणाईने उदंड प्रतिसाद दिला. त्यापूर्वी लसीचा पहिला डोस घेतलेल्या जवळपास 50 हजार ज्येष्ठ नागरिकांना आठ ते दहा दिवसापासून लसीची प्रतीक्षा करत आहेत. दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना मेसेज येत आहे. मात्र महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर डोसचा ठणठणाट आहे.
सोमवारी मध्यरात्री मनपाला 10 हजार डोस प्राप्त झाले होते. मंगळवारी दिवसभरात हे डोस संपले. बुधवारी लसीकरण मोहीम बंद ठेवावी लागली. गुरुवारीही लसीकरण होणार नाही. आतापर्यंत शहरात 4 लाख 79 हजार 976 नागरिकांना पहिला, दुसरा डोस देण्यात आला. 84 दिवस उलटल्यानंतरही नागरिकांना दुसरा डोस मिळत नाही.




