टीम हॅलो महाराष्ट्र । कुख्यात गॅंगस्टर तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक एजाज लकडावालाला मुंबई गुन्हे शाखेच्या जाळयात अडकला आहे. बिहारच्या पाटण्यातून एजाज लकडावालाला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी लकडावालाची मुलगी सोनिया लकडावाला उर्फ सोनिया शेखला शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावरुन अटक केली होती. सोनिया बनावट पासपोर्टच्या आधारे नेपाळला जाण्याच्या तयारीत होती. त्यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन एजाज लकडावालाची माहिती मिळवली. त्याद्वारे एजाज लकडावाला याचा माग काढून पोलिसांनी त्याला पाटणा येथून अटक केली.
Joint CP Crime, Santosh Rastogi on arrest of gangster Ejaz Lakadwala: His daughter was in our custody. She gave a lot of information to us. Our sources also told us about his arrival in Patna,he was arrested in Jattanpur police station limits https://t.co/KHVuAUwTDv pic.twitter.com/jiHsBznV2Y
— ANI (@ANI) January 9, 2020
एजाज लकडावालावर जवळपास २५ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. एजाज लकडावाला हा दाऊदचा अत्यंत जवळचा सहकारी आहे. मुंबईत झालेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये लकडावालाचा सहभाग होता. वर्ष २००३ मध्ये एजाज लकडावालाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र तो बँकॉकवरुन कॅनडाला पळून गेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो तिथेच होता. लकडावालाने छोटा राजनशी हातमिळवणी केल्याने दाऊद नाराज असल्याची चर्चा होती.
महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News