धक्कादायक! वॉर्डबॉयने काढला ऑक्सिजन, तडफडून रुग्णाचा मृत्यू; घटना सिसिटीव्ही मध्ये कैद

नवी दिल्ली : मध्यप्रदेशात कोरोनाचा कहर सुरु आहे. अशातच माणुसकीला काळिमा फसणारी एक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेश मधल्या शिवपुरी जिल्हा रुग्णालयातील एका रुग्णाचा ऑक्सिजन विना तडफडून मृत्यू झाला. मात्र हॉस्पिटल मधील वॉर्डबॉय ने रुग्णाचा ऑक्सिजन सपोर्ट काढून घेतल्यामुळे रुग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे समोर आली आहे.

याबाबत रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की रुग्णाची तब्येत अतिशय नाजूक असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे रुग्णालयाचे पितळ उघडे पडले. रुग्ण सुरेंद्र यांचा मुलगा दीपक रात्री अकराच्या सुमारास त्यांचे वडील सुरेंद्र यांच्या सोबत बोलत असतानाचे फुटेज सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले दिसते आहे .यानंतर दीपक गेला आणि सुरेंद्र झोपी गेले . यानंतर थोड्या वेळाने वॉर्ड बॉय खोलीत आला आणि सुरेंद्रच्या पलंगावरून पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सेन्टर बाहेर काढला. यानंतर पहाटे पाचच्या सुमारास रुग्णाला त्रास होऊ लागला आणि ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.

याबाबत सुरेंद्र यांचा मुलगा दीपक याने आरोप केला आहे की ‘रुग्णालयात माझ्या वडिलांना कुणीही ऑक्सिजन दिले नाही. सकाळी दीपक सकाळी वॉर्डात पोचला तेव्हा त्याने त्याच्या वडिलांना बेडवर तडफडताना पाहिले. दीपकच्या म्हणण्यानुसार, वडिलांना स्ट्रेचर न मिळाल्यास त्यांने वडिलांना त्याच्या पाठीवरुन आयसीयूमध्ये नेले, परंतु त्यानंतर थोड्याच वेळात पेशंटचा मृत्यू झाला.

दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिवपुरीच्या मेडिकल कॉलेजचे , अक्षय निगम यांनी म्हंटले आहे की, रुग्णाची हिमोग्लोबिन पातळी 6 ग्रॅमपर्यंत झाली होती. पण रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता नव्हती. म्हणूनच, नर्सच्या सांगण्यावरून वॉर्ड बॉयने दुसऱ्या रुग्णासाठी सुरेंद्रजवळील मशीन काढून घेतले. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक टीम स्थापन केली गेली आहे, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like