कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पालिकेतील अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांची नियुक्तीची ऑर्डर 11 एप्रिलपर्यंत न केल्यास कर्मचारी आमरण उपोषण करतील. तीन दिवसांनंतरही काही निर्णय न झाल्यास चौथ्या दिवशी सार्वजनिक आत्मदहन करतील, असा इशारा कर्मचाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. पत्रकातील माहिती अशी, जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी 25 फेब्रुवारी 2021 च्या पत्रान्वये शासन निर्णयानुसार उचित कार्यवाही करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड पालिकेतील कर्मचाऱ्यांची 31 मार्च 2022 रोजी सातारा येथे ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र, कऱ्हाडमधील अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची ऑर्डर अद्यापही काढण्यात आलेली नाही.

गेल्या 15 ते 18 वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळेल, या अपेक्षेने कर्मचारी कार्यरत आहेत. ऑर्डरसाठी 11 एप्रिलपासून आमरण उपोषणास बसणार आहोत. जर तीन दिवसांत काही निर्णय घेऊन ऑर्डर दिली नाही, तर 14 एप्रिलला सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे. पत्रकावर रणजित पाटील, रविश भोसले, श्याम थोरवडे, विरसिंग चावरे, शुभम कांबळे, रुचिका भोसले, सुहास पोळ, अमित थोरवडे, संदीप कांबळे यांच्या सह्या आहेत.

Leave a Comment