हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या विरोधातील वॉरंट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबरोबर न्यायालयाने मनोज जरांगेंना पाचशे रुपयांचा ठोठावत एक जमीनदार ही द्यायला सांगितला आहे. या निर्णयानंतर “मी न्यायालयाचा आदर करतो, न्याय सर्वांसाठी समान आहे” अशी प्रतिक्रिया म्हणून मनोज जरांगे यांनी दिली आहे. 2013 साली जरांगेंविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉरंट जारी करण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांची मुक्तता झाली आहे.
आज दुपारी ठीक 12 वाजता मनोज जरांगे पुणे न्यायालयात पोहचले होते. यानंतर पुणे न्यायालयात संबंधित प्रकरणाची सुनावणी पार पडली. ज्यात न्यायालयाने जरांगे यांचा वॉरंट रद्द केला. यासह त्यांना 500 रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. या निर्णयामुळेच आता जरांगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2013 साली न्यायालयाने जरांगे यांना एका फसवणुकीचा गुन्ह्यात वॉरंट बजावले होते. या प्रकरणाचीच आज न्यायालयात सुनावणी पार पडली. ज्यात न्यायलयाने जरांगे यांच्या बाजूने निकाल दिला.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या शिवबा संघटनेने 2013 साली एक नाटक आयोजित केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतरही संघटनेकडून पैसे देण्यात आले नाहीत असा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणामुळेच न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तर कोथरूड पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पुढे न्यायलयाने त्यांच्या विरोधात वॉरंट बजावले होते. हेच वॉरंट आज मागे घेण्यात आले.