Washing Tips : कपड्यांच्या धुलाईसाठी आता बाजारात वेगवेगळे वॉशिंग मशिन्स आले आहेत. कोणी गरम पाण्याने कपडे धुवून देते तर कुणी काही वेगळ्या पद्धतीने. मात्र असे असले तरी वॉशिंग मशीनमध्ये कपडे एकदम चकाचक होतातच असे नाही. कधी कधी आपण घाई घाईत कपडे आणि डिटर्जंट मशीनमध्ये टाकून मोकळे होतो मात्र अशाने आपल्या कपड्यावर डिटर्जन्टचे (Washing Tips) डाग पडतात. असे कपडे तुम्ही चार चौघात घालून गेलात तर मग ते बरं दिसत नाही. हे डाग काढायचे कसे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
लिंबाचा रस
लिंबाचा रस इतरही क्लीनिग च्या करण्यासाठी प्रभावी ठरते. त्याप्रमाणे डिटर्जन्टचे डाग काढण्यासाठी लिंबाचा रस उपयोगी ठरतो. लिंबाच्या रसात कॉटन बॉल बुडवून डागांवर चोळा. १५ मिनिटानंतर कापडाचा तो भाग पाण्याने धुवा. परंतु, रेशीम किंवा सुती (Washing Tips) कपड्यांवर लिंबाच्या रसाचा वापर करू नये. कारण लिंबाच्या रसामुळे हे कापड खराब किंवा त्याचे रंग उडू शकते.
बेकिंग सोडा (Washing Tips)
बेकिंग सोडा हा केवळ जेवणाच्या पदार्थात नाही तर क्लीनिग करण्यासाठी याचा प्रभावी वापर होऊ शकतो. आता कपड्यावरील डिटर्जन्टचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी तुम्हाला थोड्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वात आधी यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. त्यात बेकिंग सोडा मिसळून घट्टसर पेस्ट तयार करा. तयार पेस्ट डागांवर लावा. २० मिनिटानंतर ब्रशने हलके चोळून कापड (Washing Tips) पाण्याने धुवा.
व्हिनेगर
जेवणात वापरण्यात येणारे (Washing Tips) व्हिनेगर म्हणजे एक प्रकारचे ऍसिड आहे. याशिवाय व्हिनेगर एक उत्कृष्ट नैसर्गिक क्लिनिंग एजंट आहे, जे डिटर्जंटचे डाग काढून टाकण्यास प्रभावी ठरते. यासाठी अर्धा कप पांढरा व्हिनेगर एक बादली कोमट पाण्यात मिसळा. नंतर या पाण्यात डिटर्जंटचे डाग लागलेले कापड ३० मिनिटांसाठी भिजत ठेवा. यानंतर हलक्या हातांनी घासून स्वच्छ पाण्याने धुवा.