राहुल द्रविड टीम इंडियातील ‘या’ खेळाडूला देत आहेत पावर हिटिंगची विशेष ट्रेनिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने बांगलादेशने जिंकले आहेत तर तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी खेळला जाणार आहे. हि मालिका बांगलादेशने अगोदरच जिंकली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आपली लाज वाचवण्यासाठी शेवटचा सामना जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळेच टीम इंडियाने शुक्रवारी जोरदार प्रॅक्टिस केली. यावेळी हेड कोच राहुल द्रविड यांनी वॉशिंग्टन सुंदरवर (Washington Sundar) विशेष लक्ष दिले आहे. वॉशिंग्टन (Washington Sundar) ऑफ स्पिन गोलंदाजी बरोबर मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजीसुद्धा करतो.

सुंदरकडे पावरहिटिंगची जबाबदारी
“मागच्या काही वर्षांपासून मला फलंदाजीचा रोल मिळतोय. त्यात खास पद्धतीच्या फलंदाजीची गरज असते. मी त्यानुसारच मेहनत घेतोय. आता ती मेहनत फळाला येतेय” असं वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) म्हणाला आहे. तसेच तो म्हणाला कि “मागच्या काही महिन्यात मला माझ्या मेहनतीच फळ मिळालं, याचा आनंद आहे. येणाऱ्या दिवसात चांगलं प्रदर्शन सुरु राहील, अशी अपेक्षा आहे”.

बांग्लादेश विरुद्ध चालू सीरीजमध्ये पहिल्या दोन सामन्यात सुंदरने पाच विकेट घेतल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) गेल्या काही काळापासून दुखापतग्रस्त होता. नुकतेच त्याने टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आहे. वॉशिंग्टन सुंदरने अलीकडेच न्यूझीलंड दौऱ्यावर आक्रमक अर्धशतक झळकावल होते.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या