व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एक दोनदा नाहीतर 16 वेळा चावला ! कुत्र्याचा चिमुरडीवर जीवघेणा हल्ला

चेन्नई : वृत्तसंस्था – चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका कुत्र्याने लहान मुलीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या कुत्र्याने एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 16 वेळा या मुलीला चावा घेतला आहे. या हल्ल्यात हि मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती सध्या नाजूक आहे. या मुलीवर ज्या कुत्र्याने हल्ला केला तो रस्त्यावरील कुत्रा नसून पाळीव कुत्रा होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कधी आणि कुठे घडली घटना ?
ही घटना 28 डिसेंबर रोजी चेन्नईच्या नोलंबूरमध्ये घडली आहे. नोलंबूरच्या श्रीराम नगर परिसरात एक कुटुंब राहत होतं. त्यांची 9 वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी एकजण आपल्या आपल्या घरात पाळलेल्या कुत्र्याला घेऊन बाहेर हिंडायला निघाला होता. यावेळी कुत्र्याने अचानक या मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात हि मुलगी गंभीर जखमी झाली.

काय घडले नेमके ?
श्रीराम नगरमध्ये राहणारी एक ही नऊ वर्षांची मुलगी आपल्या घरातून बाहेर फिरण्यासाठी निघाली होती. तेव्हा या कुत्र्याची मालकीण आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायाला निघाली होती. यावेळी हा कुत्रा 9 वर्षांच्या मुलीच्या आधी मागे लागला. कुत्रा मागे लागल्याचं पाहून प्रचंड घाबरलेली मुलगी त्या ठिकाणाहून पळाली. यानंतर काही अंतरावर या मुलीचा तोल जाऊन ती पडली. यावेळी या कुत्र्याने 16 वेळा मुलीचा चावा घेतला. यानंतर स्थानिकांनी लगेचंच मुलीच्या दिशेनं धाव घेऊन तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी चेन्नईतील नोलंबूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या पाळीव कुत्र्यांची मालकीण असलेल्या विजयालक्ष्मी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.