मेसीला मागे टाकत सुनील छेत्रीने केला ‘हा’ विक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दोहा : वृत्तसंस्था – भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि अव्वल स्ट्रायकर सुनील छेत्रीने अर्जेंटीनाचा सुपर स्टार लियोनेल मेस्सीचा विक्रम मोडला आहे. सुनील छेत्रीने सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. ३६ वर्षीय छेत्रीने सोमवारी फिफा वर्ल्डकप २०२२ आणि एएफसी आशिया कप २०२३च्या पात्रता फेरीच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध दोन केले आहेत. या दोन गोलांसह सुनील छेत्रीच्या आंतरराष्ट्रीय गोलची संख्या ७४ एवढी झाली आहे.

भारताचा वर्ल्डकप पात्रता फेरीत मागच्या सहा वर्षातील हा पहिला विजय आहे. या विजयामध्ये सुनील छेत्री यांनी मोलाची भूमिका बजावली. यानंतर सुनील छेत्रीने जागतिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. या यादीमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डो अव्व्ल स्थानी आहे. त्याच्या नावावर १०३ गोल आहेत. बार्सिलोनाचा स्टार मेसी पेक्षा छेत्री दोन गोलने तर अली मबखौत पेक्षा एक गोलने पुढे आहे. मेसीने गुरुवारी चिली विरुद्ध वर्ल्ड कप पात्रता फेरीत ७२वा गोल केला होता.

सुनील छेत्री याने सोमवारी जासिम बिन हमाद स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ७९ मिनिटाला आणि ९०+२ मिनिटांत दुसरा गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी भारताच्या विजयाचे व सुनील छेत्रीच्या विक्रमाचे कौतुक केले आहे. भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने मेसीला मागे टाकत ७४ गोलसह सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान मिळवल्यामुळे कर्णधाराचे खुप खुप अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा. असे मत प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले आहे. भारताची पुढील लढत १५ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

Leave a Comment